हमाल-कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
हमाल-कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  
मुख्य बातम्या

परभणी बाजार समितीत हमाल-कामगार, व्यापाऱ्यांचा बंद

टीम अॅग्रोवन

परभणी : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हमाल-कामगारांचा संप सुरू असताना बाजार समिती यार्डावरील मार्केट व्यापारी असोसिएशनतर्फे सोमवारी (ता. २७) बेमुदत बंद सुरू करण्यात आला आहे. या बंदमध्ये अडत व्यापारी महासंघ, जिनिंग-प्रेसिंग असोशिएशन, कृषी निविष्ठा विक्रेते सहभागी झाल्यामुळे बाजार समिती यार्डातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पाच दिवसांपासून शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. माथाडी कामगार कायद्याच्या अमंबजावणीसाठी मजदूर युनियन (लाल बावटा)ने गुरुवार (ता. २२) पासून बेमुदत संप सुरू केला आहे. जिल्हा प्रशासन, हमाल-कामागार, बाजार समिती प्रशासन, व्यापारी असोसिएशन यांच्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हमाल कामगारांचा संप सुरूच आहे. या संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडती, जिनिंग-प्रेसिंग, कृषी निविष्ठा, किराणा मालाचे गोदाम आदी ठिकाणची कामे ठप्प झाली आहेत. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गतच्या खरेदी केंद्रावरील शेतीमालाच्या खरेदीदेखील बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  हमाल -कामगार कामावर येत नसल्याने व्यवहार ठप्प झाल्यामुळे परभणी येथील बाजार समितीतील सध्याचे हमालीचे दर मराठवाड्यातील इतर बाजारपेठांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे व्यापारी हमालीच्या दरात आणखी वाढ करण्यास व्यापारी तयार नाहीत. हमालीचे दर वाढविल्यास त्याचा परिणाम बाजारपेठेवर होऊ शकतो. त्यामुळे नवा मोंढा भागातील बाजारपेठ बेमुद बंद ठेवण्यात येणार आहे, असे मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल जैन, उपाध्यक्ष गोविंद अजमेरा, जिनिंग-प्रेसिंग संघटनेचे हरीश कत्रुवार यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी (ता. २७) सकाळी माथाडी कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मजदूर युनियन (लाल बावटा)तर्फे विलास बाबर, राजन क्षीरसागर, शेख महेबूब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हमाल-कामगारांचा मोर्चा काढण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT