राज्यात आज गारपिटीचा इशारा
राज्यात आज गारपिटीचा इशारा 
मुख्य बातम्या

राज्यात आज गारपिटीचा इशारा

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी जोरदार वारे, धुळीचे वावटळी उठून गारपिटीसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल तापमानातही मोठी वाढ झाल्याने चटका असह्य होत आहे. मंगळवारी (ता.२४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे हंगामातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे. दुपारनंतर ढग दाटून येत काही ठिकाणी जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.    गेल्या काही दिवसापासून उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. सोलापूरसह, जळगाव, मालेगाव, सांगली, परभणी, अकोला, अमरावती येथे तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. तर बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे असल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. पावसाला पोषक हवामान असल्याने मंगळवारी (ता.२४) दुपारनंतर ढग गोळा होण्यास सुरवात झाली. ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाल्याचे दिसून आले. 

मंगळवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.८ (१९.३), जळगाव ३८.० (२२.२), कोल्हापूर ३७.१ (२२.३), महाबळेश्‍वर ३२.५ (१९.३), मालेगाव ३८.०, नाशिक ३६.४ (२०.४), निफाड ३५.५ (१६.४), सांगली ३८.४ (२२.२), सातारा ३७.४ (२१.१), सोलापूर ३९.२ (२६.३), अलिबाग ३६.८ (२३.५), डहाणू ३२.४ (२३.०), सांताक्रूझ ३४.३ (२३.४), रत्नागिरी ३२.८ (२३.५), औरंगाबाद ३६.५ (२०.५), परभणी ३८.३ (२१.७), अकोला ३८.७ (२१.१), अमरावती ३८.० (२३.०), बुलडाणा ३५.० (२२.६), चंद्रपूर ३७.८ (१९.५), गोंदिया ३४.२ (२०.२), नागपूर ३६.८ (१८.५), वर्धा ३७.० (२२.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT