onion damage
onion damage  
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही गरपीट 

टीम अॅग्रोवन

नाशिक: गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. प्रामुख्याने कसमादे भागात सटाणा तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यात उन्हाळ कांदा पिकाला मोठा फटका बसला. अनेक भागांत गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. 

शनिवारी (ता.20) दुपारी तीन वाजेनंतर निफाड व सटाणा तालुक्यात गारपीट झाली होती. रविवार(ता.21) सायंकाळनंतर सटाणा व कळवण तालुक्यातील अनेक भागात गारपिटीने पुन्हा एकदा दाणादाण उडवली आहे. सध्या कांदा काढनियोग्य झाला असून काढण्याच्या कामाला वेग आला आहे. मात्र सटाणा तालुक्यात तळवाडे दिगर, मुल्हेर,अंतापूर,ताहाराबदसह मोसम खोऱ्यात बिलपुरी पर्यंत हा फटका आहे. तर कळवण तालुक्यात शहरासह भेंडी, पाळे परिसरात पाऊस व झालेल्या गारांनी कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान केले आहे. 

सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन  भोकणी, दापूर, देवपूर, शहा,दोडी परिसरात कांदा व डाळिंब पिकाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गारा साचल्या होत्या. येवला तालुक्याच्या पश्चिम भागात निमगाव मढ, चिंचोडी, साताळी, रायते, अंगणगाव परिसरात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेला गहू आडवा झाला आहे. तर निमगाव मढ येथे शिवाजी दिवटे यांचा भोपळ्याचा बाग जमीनदोस्त झाला आहे.त्यामुळे या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. अनेक भागात नुकसान वाढते असून  रब्बी हंगामातील गहू, हरभरा यासह कांदा हे नगदी पीक हाती येईल की नाही अशी स्थिती आहे. 

सटाणा तालुक्यात सर्वाधिक गारपीट  तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात रविवार (ता.21) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वारा, वीजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातले. तळवाडे दिगर, पठावे दिगर येथे  गारांचा अक्षरशः खच पडला होता. या वादळी पावसात कांद्यासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून बाजूला रस्त्यावर पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. आदिवासी पश्चिम पट्ट्यातील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. उपटून खांडणीच्या तयारीत शेतात पडलेला हजारो क्विंटल उन्हाळी कांदा भिजला. गारपीटीची सर्वाधिक झळ कांदासह भाजीपाला पिकांना बसली आहे. या गारपिटीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT