मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपीटीची शक्यता
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपीटीची शक्यता 
मुख्य बातम्या

मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची शक्यता

टीम अॅग्रोवन

पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा ते मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. येत्या शुक्रवारी (ता. २३) मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार तर शनिवारी (ता. २४) औरंगाबाद, जालना, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती भागांंत मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी विर्तविली.  लक्षद्वीप परिसर ते अरबी समुद्र, कर्नाटक व महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र लक्षद्वीपकडून अरबी समुद्र, गोवा, कर्नाटकच्या दिशेने सरकत आहे. तसेच बांग्लादेशच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २२) हिमालयाच्या काही भागांत गारपीट होण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. शुक्रवारी (ता. २३) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील. शनिवारी (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात गारपीटीची शक्यता आहे. उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील. मंगळवारी (ता.२०) गोव्यासह, संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागांत, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १०.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात गारपीटीचा अंदाज; राज्यातील विविध भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Sugar Price Hike : ऐन निवडणुकीत साखरेच्या दरात तेजी, क्विंटलचा दर वाढल्याचा कोणाला फायदा?

Animal Ear Tagging : जनावरांचे टॅगिंग न केल्यास खरेदी-विक्रीला रोख लागणार

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने नागपूर, भंडारा आणि चंद्रपुरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

SCROLL FOR NEXT