कृषी तंत्रनिकेतनकरिता राज्यात आता गुजरात पॅटर्न 
मुख्य बातम्या

कृषी तंत्रनिकेतनकरिता राज्यात आता गुजरात पॅटर्न

काही विद्यापीठांनी दोन वर्षे कालावधीच्या व सेमी इंग्रजी पॅटर्न अभ्यासक्रमाच्या जाहिराती प्रकाशीत केल्या आहेत. गुजरात पॅटर्नच्या अंमलबजावणीस उशीर लागण्याची शक्‍यता पाहता त्यांच्याव्दारे जाहिरात दिली गेली.त्यामुळे गोंधळून न जाता संबंधीत कृषी तंत्रनिकेतन संचालकांना दोन वर्ष किंवा तीन वर्षे अशा दोन्ही अभ्यासक्रमाकरिता प्रवेश देण्याची मूभा राहणार आहे. त्याकरिता त्यांनी विद्यापीठस्तरावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे. नव्या अभ्यासक्रमामुळे सुसूत्रता येणार आहे. - हरिहर कौसडीकर, संचालक (शिक्षण), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे

टीम अॅग्रोवन

नागपूर ः कृषी तंत्रनिकेतनच्या तीन वर्षांच्या इंग्रजी अभ्यासक्रमाला महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने मान्यता दिली आहे. त्याकरिता कृषी तंत्रनिकेतनचा गुजरात पॅटर्न परिषदेकडून अभ्यासण्यात आला. यापूर्वी कृषी तंत्रनिकेतनसाठी महाराष्ट्रात सेमी इंग्रजी पॅटर्न राबविण्यात येत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.  दहावीनंतर तीन वर्षांचा असलेला कृषी तंत्रनिकेतन अभ्यासकम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बी.एस.सी. (कृषी) अभ्यासक्रमाच्या व्दितीय वर्षाला थेट प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रात मात्र सेमी इंग्रजी पॅटर्ननुसार हा अभ्यासक्रम शिकविला जात होता. या अंतर्गत अर्धे विषय इंग्रजीत तर अर्धे विषय मराठीत शिकविण्यात येत होते. त्यासोबतच दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम असल्याने हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बी.एस.सी. व्दितीय वर्षाला प्रवेशही दिला जात नव्हता.  गुजरात राज्यात मात्र कृषी तंत्रनिकेतन हा अभ्यासक्रम तीन वर्षे कालावधीचा आहे. संपूर्ण इंग्रजी असल्याने गुणांकन देण्यातही त्या ठिकाणी अडचणी येत नव्हत्या. गुजरात पॅटर्नची अंमलबजावणी महाराष्ट्रात व्हावी, अशी मागणी कृषी तंत्रनिकेतनचालकांची होती. त्याची दखल घेत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने एक अभ्यास गट स्थापन केला. या अभ्यास गटाच्या माध्यमातून गुजरातमधील कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाशी संबंधित माहिती घेण्यात आली. गुजरात पॅटर्न कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक असल्याचे सिद्ध झाल्यानंतर यावर्षीच्या सत्रापासून त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या कृषी तंत्रनिकेतनमध्ये यापुढे तीन वर्षे कालावधीचा पूर्ण इंग्रजी अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Fodder Cultivation Plan: पुणे जिल्ह्यात १० हजार १०० हेक्टरवर चारा लागवड; सध्याचा साठा फक्त तीन महिन्यांसाठी

Soybean Crop Damage: पाण्याअभावी सोयाबीन पीक करपले; खेड तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात

Farmer Financial Assistance: चार नोव्हेंबरपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत मिळणार

Mission Mausam: ‘मिशन मौसम’अंतर्गत हवामान निरीक्षणासाठी भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि कृषी विद्यापीठात करार

Agriculture Service Improvement: कृषी उद्योजकांच्या सेवा कार्यपद्धतीत सुधारणा; परवाने, तपासणी अहवालांचे वितरण जलद होणार

SCROLL FOR NEXT