मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यातील सात तालुक्यांतील भूजलपातळीत वाढ

टीम अॅग्रोवन

परभणी : जिल्ह्यातील परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या सात तालुक्यांतील भूजलपातळीमध्ये २०१८ च्या तुलनेत यंदाच्या (२०१९) महिन्यात सप्टेंबर महिन्यामध्ये वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. परंतु, जिंतूर आणि सेलू या दोन तालुक्यांतील भूजलपातळीत वाढ झालेली नाही. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या निरीक्षण विहिरीतील पाणीपातळीच्या नोंदीनंतर हे आढळून आले आहे. 

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे यंदाच्या (२०१९) सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील ८६ निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. यंदा जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत राहिला. परंतु, गतवर्षीप्रमाणे पावसाचा दीर्घ खंड पडला नाही. 

सप्टेंबर महिन्यात अनेक तालुक्यांतील मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील नऊ पैकी परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या सात तालुक्यांतील भूजलपातळीमध्ये ०.०६ ते २ मीटरने वाढ झाली. परंतु जिंतूर, सेलू या दोन तालुक्यांतील अनेक मंडळामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे भूजलपातळीत वाढ झाली नाही. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात गतवर्षीप्रमाणेच सेलू तालुक्यातील भूजलपातळी सर्वाधिक म्हणजे १०.२३ मीटर खाली, तर पूर्णा तालुक्यातील भूजलपातळी सर्वांत वर म्हणजे १.४७ मीटर असल्याचे आढळून आले.

गेल्या पाच वर्षांतील सरासरी भूजलपातळीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर महिन्यात भूजलपातळी जिंतूर तालुक्यात ०.२३ मीटरने, तर सेलू तालुक्यात २.१० मीटरने कमी झाली. २०१४ ते २०१८ या पाच वर्षांतील सरासरी भूजलपातळीच्या तुलनेत यंदा परभणी तालुक्यातील भूजलपातळी १.७३ मीटरने वर, मानवत तालुक्यात ०.८४ मीटरने, पाथरी तालुक्यात १.६६ मीटर, सोनपेठ तालुक्यात १.९६ मीटर, गंगाखेड तालुक्यात १.५१ मीटर, पालम तालुक्यात ०.९६ मीटर, पूर्णा तालुक्यात २.४१ मीटरने वर आली.

गतवर्षी ऑगस्ट महिन्यातच बहुतांश भागांत पाऊस उघडला होता. यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत अनेक भागांत पाऊस सुरू होता. ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणाऱ्या नोंदी नंतर भूजलपातळीत बदल झाल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतरच पाणीटंचाई उद्भभवणाऱ्या गावांची संख्या समजू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT