प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र 
मुख्य बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील २४ कारखान्यांना गाळप परवाना

टीम अॅग्रोवन

माळीनगर, जि. सोलापूर  : जिल्ह्यातील २४ साखर कारखान्यांना एक नोव्हेंबरअखेर यंदाच्या हंगामात ऊस गाळपासाठी साखर आयुक्तालयाकडून परवाना मिळाला असून, आठ साखर कारखान्यांना गाळप परवान्याची अद्याप प्रतीक्षा आहे. दरम्यान, एक नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील आठ कारखान्यांनीच गाळप सुरू केले आहे. 

यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र,गाळप हंगामाच्या तोंडावर झालेला पाऊस, ऊस वाहतुकदारांनी उगारलेला संपाचा बडगा यामुळे कारखान्यांना प्रत्यक्ष गाळप सुरू करण्यास विलंब झाला. गाळप परवाना मिळालेल्या जिल्ह्यातील २४ पैकी सात कारखानेच सुरू झाल्याचे आकडेवारी सांगते. गाळप परवाना मिळालेल्या बहुतांश साखर कारखान्यांनी मोळी पूजन केले  आहे. पण गाळपास अद्याप सुरवात व्हायची आहे. 

गाळप परवाना मिळालेले कारखाने  भैरवनाथ शुगर-३, लोकमंगल ॲग्रो, लोकमंगल शुगर, भैरवनाथ शुगर-३, सासवड माळी, कूर्मदास, विठ्ठलराव शिंदे, बबनराव शिंदे शुगर्स, युटोपियन शुगर्स, विठ्ठल कार्पोरेशन, श्री पांडुरंग, सहकार महर्षी, भैरवनाथ-५ (आलेगाव), सिद्धेश्‍वर, जकाराया शुगर, जयहिंद, गोकूळ शुगर्स, शेतकरी चांदापुरी (ओंकार शुगर्स), सीताराम महाराज खर्डी, गोकूळ माउली, लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज अनगर, विठ्ठलराव शिंदे युनिट-२ करकंब, औदुंबररावजी पाटील, सांगोला साखर कारखाना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT