Shaktipeeth Highway : शेतात तिरंगा फडकवून ‘शक्तिपीठ’विरोधी नारा

Farmer Agitation Kolhapur : स्वातंत्र्यदिनी शेतकरी आपल्या शिवारात तिरंगा झेंडा फडकवून ‘शक्तिपीठ’विरोधी नारा देणार आहेत. तसेच महामार्गाच्या विरोधात ग्रामसभांमध्ये ठराव करून ते सरकारला पाठविले जातील.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : स्वातंत्र्यदिनी शेतकरी आपल्या शिवारात तिरंगा झेंडा फडकवून ‘शक्तिपीठ’विरोधी नारा देणार आहेत. तसेच महामार्गाच्या विरोधात ग्रामसभांमध्ये ठराव करून ते सरकारला पाठविले जातील.

त्याचबरोबर बुधवारी (ता. १३) दिल्ली येथे होणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आंदोलनात शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी आपापल्या जिल्ह्यांत व कोल्हापुरातील शेतकरी बिंदू चौकात सहभागी होतील, असा निर्णय शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमीन मोजणीस येणाऱ्यांना गावबंदी

संघर्ष समितीतर्फे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी १२ जिल्ह्यांतील प्रतिनिधींची ऑनलाइन बैठक शनिवारी (ता. ९) घेण्यात आली. या वेळी आमदार सतेज पाटील, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अमित देशमुख, आमदार अरुण लाड, आमदार कैलास पाटील,

माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार वैभव नाईक, श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्याध्यक्ष संपत देसाई, लाल बावटाचे शिवाजी मगदूम, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आदींसह १२ जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमिनीच्या मोजणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर

आमदार सतेज पाटील म्हणाले, की या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे सरकारने हा मार्ग न करता इतर आवश्‍यक मार्गांची कामे करावीत. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. असे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सर्वांनी वेगवेगळी आंदोलने न करता नियोजनबद्धरीत्या एकत्रच आंदोलने करावीत. गणेशोत्सवानंतर १२ जिल्ह्यांमध्ये दौरा करण्यात येईल.

राजू शेट्टी म्हणाले, की या आंदोलनात सर्वपक्षीय एकत्र येऊ शकत नाहीत, कारण म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून कोणाला ठेके घ्यायचे आहेत, कोणाला मुख्यमंत्र्यांना खूष करायचे आहे, कोणाला हिस्से घ्यायचे आहेत, त्यामुळे ते एकत्र येणे शक्य नाही.

महामार्गाविरोधात १२ जिल्ह्यांत मेळावे घेतल्यास राज्य सरकारला मोठी चपराक बसेल. कोल्हापूर जिल्ह्यात सात मेळावे घेण्याचे नियोजन आहे. या वेळी विजय देवणे, उमेश देशमुख, गोविंद ऱ्हाटवळ, अजय बुरांडे, अनिल लाड, सुभाष मोरलवार, बापूराव ढोरे, गणेश घोडके, संध्या कदम, सतीश कुलकर्णी यांनी सूचना मांडल्या

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com