माळढोक 
मुख्य बातम्या

सर्वेक्षणात माळढोक आढळलाच नाही

Sudarshan Sutaar

सोलापूर ः राज्यात गेल्या काही दिवसांत वन्यजीव विभागाकडून विशेष सर्वेक्षण करण्यात आले. भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून व महाराष्ट्र वन्यजीव विभागाच्या वतीने माळढोक व इतर पक्ष्यांची गणना करण्यासाठी मुख्यतः हे सर्वेक्षण करण्यात आले. राज्यात ३१ पथकांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली. पण त्यामध्ये माळढोक पक्षी आढळलाच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकाराने सोलापूर जिल्ह्याला ओळख देणाऱ्या या पक्ष्याच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. नामशेष होत चाललेल्या माळढोक पक्ष्याची संख्या राज्यामध्ये किती आहे, हे जाणून घेण्यासाठी डेहराडून संस्थेला माळढोक पक्ष्याच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिली होती. माळढोकसोबत हरीण, काळवीट, खोकड, लांडगा, ससा, चिंकारा या प्राण्यांचीही गणना झाली.

आठ-दहा वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक पक्षी अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर माळढोक पक्षी आढळून येत होते. मागील वर्षी बौद्ध पौर्णिमेला झालेल्या गणनेमध्येही दोन माळढोक आढळून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात नान्नज येथेसुद्धा एकही माळढोक आढळला नसल्याचे सांगण्यात आले. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाचा संपूर्ण अहवाल येण्यास काही महिन्यांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Crop Insurance: पीक विम्याच्या लाभात ‘शेतकरी उपाशी, कंपन्या मात्र तुपाशी’

Ahilyanagar Heatwave Alert: अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम

Yavatmal Crop Insurance: पीकविमा भरपाईतून यवतमाळ जिल्हा वगळला

Fertilizer Shop License Suspension: परभणी जिल्ह्यातील ९ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बॅंकेला २०८ कोटींचा नफा

SCROLL FOR NEXT