grapes
grapes  
मुख्य बातम्या

द्राक्ष व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना सव्वातीन लाखांचा गंडा

टीम अॅग्रोवन

नाशिक : निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे आणि कसबे सुकेणे येथील तीन अल्पभूधारक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पिंपळगाव बसवंत येथील द्राक्ष व्यापाऱ्याने सव्वातीन लाखांना गंडा घातला आहे. या व्यापाऱ्याने पैसे न देताच पोबारा केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी, की मौजे सुकेणे येथील संदेश प्रकाश मोगल व कसबे सुकेणे येथील नंदू दशरथ भंडारे, राहुल कारभारी भंडारे या शेतकऱ्यांचा द्राक्षमाल आग्रा येथील द्राक्ष व्यापारी रवींद्र गोस्वामी याने घेतला होता. द्राक्ष बाग सुरू केल्यानंतर दोन दिवसांत पैसे देतो, असे सांगून द्राक्ष बाग अर्धवट सोडून पैसे न देता त्याने पोबारा केला आहे. त्यात अनुक्रमे संदेश मोगल एक लाख ६० हजार ६५० रुपये, नंदू भंडारे एक लाख ३५ हजार २०० रुपये व राहुल भंडारे एक लाख १२ हजार ७०० रुपये यांचे जवळपास सव्वातीन लाख रुपये व्यापाऱ्याने दिले नाहीत. संदेश मोगल यांना २० हजार रुपये दिले आहेत. 

ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल   संशयित व्यापारी रवींद्र गोस्वामी हा दुचाकीने (यूपी ८०, एफएम २१८६) येत होता. ओझर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक रहाटे तपास करीत आहेत.  

प्रतिक्रिया आग्रा येथील व्यापारी रोखीने पैसे देऊन द्राक्ष माल खरेदी करत होता. परंतु विक्रीत अडथळे येत आहेत. दोन दिवसांत पैसे देतो, असे सांगून पैसे न देताच त्याने पलायन केले. पिंपळगाव अडत ठिकाणाहून त्याची चौकशी होऊन आमचे पैसे मिळावे हीच अपेक्षा आहे.  - संदेश मोगल, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मौजे सुकेणे ओझर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व शेतकऱ्यांना यापूर्वीच व्यापाऱ्याचे आधार कार्ड, पॅन कार्डच्या झेरॉक्स ताब्यात घ्याव्यात व चौकशीअंती द्राक्ष बाग द्याव्या, अशा सूचना केल्या आहे. या सूचना शेतकऱ्यांनी लक्षात ठेवाव्यात. दोषी व्यापाऱ्यांची चौकशी केली जाईल.  - अशोक रहाटे, पोलिस निरीक्षक, ओझर पोलिस स्टेशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT