संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌ध्वस्त

टीम अॅग्रोवन

भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील चार हजार एकरावरील द्राक्षबागांना गेल्या पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. फुलोऱ्याच्या स्थितीतील अंदाजे १२०० एकर द्राक्षबागा उद्‌ध्वस्त झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंदापूर तालुक्‍यातील बोरी, काझड, शिंदेवाडी, भरणेवाडी, शेळगाव, निमगाव केतकी, वरकुटे, अंथुर्णे, कळस, बिरंगुडी, कडबनवाडी अशा विविध भागांत द्राक्षबागांचे मोठे क्षेत्र आहे. ८ जुलैपासून या तालुक्‍यात तीन टप्प्यांत द्राक्षबागांची छाटणी केली जाते व बहार धरला जातो. मात्र ८ जुलैपासून ते ५ ऑक्‍टोबरपर्यंत छाटणी झालेल्या बागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. 

इंदापूर तालुक्‍यात हंगामातील अंदाजे २०० एकरांवरील द्राक्षबागा असून त्यातील घडांतील मणी या पावसाने फुटले आहेत. या बागांचे पूर्णतः नुकसान झाले असून द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत. पूर्वहंगामी या बागांबरोबरच ज्या बागा सध्या फुलोऱ्यात व घड तयार होण्याच्या स्थितीत आहेत, त्या बागांना डाऊनीचा मोठा फटका बसला असून मणी व घडांवरही डाऊनीचा प्रादुर्भाव या वेळी पहिल्यांदाच दिसत असल्याची माहिती द्राक्ष उत्पादकांनी दिली. 

या वर्षी नुकसान प्रचंड होणार आहे. २०१७ नंतर द्राक्ष उत्पादकांचा खर्च तर वाया जाणारच, मात्र पुन्हा कर्जाच्या खाईत जातील अशी भीती वाटते, असे बोरी (ता. इंदापूर) येथील द्राक्ष निर्यांतदार  रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT