पावसाचा द्राक्षपिकाला फटका
पावसाचा द्राक्षपिकाला फटका 
मुख्य बातम्या

फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;डाळिंबाचा मोहोर झडला 

टीम अॅग्रोवन

सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी, धुमाळवाडी भागांत मागील पाच दिवस मुसळधार पाऊस झाल्याने फलोत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. काढणीस आलेले द्राक्षांचे घड फुटले असून डाळिंबाचा मोहोर झडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. या परिसरातील २२ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. 

सोमवारी (ता. २१) मध्यरात्रीच्या सुमारे तालुक्यातील विविध भागांना पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे फळबागा, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. विशेषतः द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसला. जी द्राक्ष काढणीस तयार झाली होती अशा द्राक्षांच्या मण्यांना पावसाने तडे गेले. दोन दिवसांत द्राक्षांचे घड कुजू लागतील अशी स्थिती असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या काढणीला आलेली द्राक्ष खराब झाल्याने ती विकता येणार नाही. हा निघणारा माल प्रक्रिया उद्योगांसाठी कवडीमोल किमतीने घालण्याची वेळ आली आहे.

या परिसरात मागील काही वर्षांत डाळिंब बागांची लागवड केली जात असल्याने डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे. ज्या शेतकऱ्यांनी डाळिंब बागांना फुलोरा धरला होता. तो फुलोरा या पावसाने जमीनदोस्त झाला. नवा बहर धरण्यासाठी त्यांनी डाळिंबाची छाटणी करून पाणी तोडले होते. अशा डाळिंबाचे फळ उत्पादन घेण्याचा काळ लांबणीवर पडला आहे. या पावसामुळे डाळिंबावर तेलकट डाग, करपा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी फवारण्यांचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. नुकसानग्रस्त फळबागांची आमदार दीपक चव्हाण, कृषी सहाय्यक प्रवीण बनकर यांनी पहाणी केली. प्रत्यक्ष पहाणीनुसार २२ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले आहे. 

नुकसानग्रस्त पिकांसाठी सरकार अत्यल्प दराने नुकसानभरपाई देते. त्यातून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. शनिवारच्या पावसाने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांवर नुकसानीचे हे अस्मानी संकट कोसळले आहे. किमान उत्पादन खर्च भरून निघेल एवढी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT