संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे जिल्हा परिषद देणार गाय-म्हैस खरेदीसाठी अनुदान

टीम अॅग्रोवन

पुणे   : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून यंदा गाय-म्हैस खरेदीसाठी २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तसेच अनुदानावर खरेदी केलेल्या जनावराचा एक वर्षाचा विमाही काढण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना मिल्किंग मशिन, कडबा कुट्टी व विविध वस्तूंसाठीही १५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती पशुंवर्धन विभागातर्फे देण्यात आली.   

जिल्ह्यातील पशुपालकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तिक लाभासाठी थेट लाभ हस्तांतर योजना राबविली जाते. त्यामध्ये मैत्रीण योजनेअंतर्गत तीन शेळ्यांसाठी अनुदान दिले जात होते. परंतु जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडूनही शेळी आणि मेंढी दिली जाते. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून या वर्षी थेट लाभ हस्तांतर योजनेअंतर्गत गाई-म्हैस आणि विविध वस्तूंचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा पशुसंवर्धन विभागाकडून गाय - म्हैस खरेदीसाठी अनुदान देण्यात आहे.

गतवर्षी शेतकऱ्यांसमोर मिल्किंग मशिन हा एकच पर्याय असल्यामुळे लाभार्थ्यांची संख्याही कमी झाली होती. त्यामुळे यंदा मिल्किंग मशिनसह, मुक्त संचार गोठा अंतर्गत जाळी पुरवठा, मुरघास युनिट तयार करणे, रबर मॅट, सिंगल फेज विद्युत चलित कडबाकुट्टी मशिन या पाच वस्तूंचा पर्याय देण्यात येणार आहे. लाभार्थ्याला त्यापैकी एका वस्तूसाठी १५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तर १०० तलंग कुक्कुट पक्ष्यांसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातफे देण्यात आली. त्यापैकी कोणत्याही एका वस्तूसाठी अनुदान देण्यात येणार आहे,  अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

Painganga Project : निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम शेतकऱ्यांनी पाडले बंद

SCROLL FOR NEXT