कोल्हापुरात यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान थकले
कोल्हापुरात यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान थकले  
मुख्य बातम्या

कोल्हापुरात यांत्रिकीकरण योजनेचे अनुदान थकले

Raj Chougule

कोल्हापूर : कृषी यांत्रिकीकरण योजना अद्यापही थकबाकीतच अडकली आहे. २०१७-१८ चे थकीत अनुदान शेतकऱ्यांना दिल्याशिवाय २०१८-१९ च्या सोडती काढू नका, अशा सूचना आल्याने आता जिल्ह्यात यांत्रिकीकरण योजनेच्या यंदाच्या सोडतीचे कामकाजही ठप्प झाले आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी औजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाते. ट्रॅक्‍टर व इतर औजारे असे दोन विभाग केले आहेत. इतरमध्ये पॉवर ट्रिलर, रोटाव्हेटर, मळणी मशिन, पेरणी यंत्र यांसह विविध औजारांचा समावेश आहे. कृषी विभाग इच्छुक शेतकऱ्यांकडून आलेल्या अर्जातून सोडत काढतो. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या रकमेने औजारांची खरेदी करून बिले सादर केल्यानंतर अनुदान देण्यात येते.

२०१७-१८ मध्ये जिल्ह्यात सुमारे तीनशे शेतकऱ्यांना १८ कोटी २३ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले. यापैकी २ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. तोच २०१८-१९ च्या योजनेची कार्यवाही झाली. सप्टेंबर मध्यापर्यंत या योजनेत जिल्ह्यातून ७८१५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. यंदाच्या योजनेची अंमलबजावणी म्हणून गडहिंग्लज उपविभागाने सोडती काढल्या आहेत. यामध्ये आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरड आदी तालुक्‍यांचा समावेश आहे. आता वरिष्ठ पातळीवरून जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला सूचना आल्यानंतर सोडतीचे काम थांबविण्यात आले आहे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात थकीत रक्कम वर्ग करण्याबाबतचे आदेश आले अाहेत. तरीही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे ही रक्कम वर्ग केल्याची माहिती आली नाही. यामुळे अद्यापही या योजनेचे अनुदान वितरित झालेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT