ग्रामसेवकांना काम नाही तर वेतनही नाही
ग्रामसेवकांना काम नाही तर वेतनही नाही 
मुख्य बातम्या

ग्रामसेवकांना काम नाही तर वेतनही नाही

टीम अॅग्रोवन

पुणे ः ग्रामसेवकांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला आठ दिवस झाले. अद्याप या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प असून, ग्रामस्थांनी अनेक कामे रखडली आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून ग्रामसेवकांना काम नाही, तर वेतनही नाही (नो वर्क, नो पेमेंट) अशी नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु, जिल्ह्यात कोणीही ग्रामसेवक कामावर हजर झाले नाही.

राज्यातील ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ग्रामसेवक संघटना आक्रमक झाली आहे. शुक्रवारपासून (ता. २३) असहकार आंदोलनानंतर आता पूर्णपणे काम बंद आंदोलन पुकारले आहे. अनेक ग्रामसेवकांनी त्यांचे सही शिक्‍के आणि महत्त्वाचे प्रशासकीय साहित्य गटविकास अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची प्रशासकीय कामे बंद झाली आहेत. शनिवार आणि रविवार दोन दिवस सुटी आल्यामुळे ग्रामस्थांना अडचणी आल्या नाही. सोमवारी संप मिटेल आणि प्रशासकीय कामे सुरू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, अद्यापही संपावर तोडगा निघालेला नाही.

दरम्यान, मागील आठवड्यापासून ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्ष चालवणाऱ्या संगणक ऑपरेटर यांनी देखील बेमुदत संप पुकारल्याने दाखले देण्याचे काम बंद आहे. या संगणक ऑपरेटर यांच्या मागण्यांवर अद्याप निर्णय झालेला नाही.

राज्य शासनाच्या आदेशानुसार ग्रामसेवकांना काम नाही तर वेतनही नाही, ही नोटीस देण्यात आली. पर्यायी व्यवस्था म्हणून, जिल्ह्यात नियुक्‍तीस असणारे कंत्राटी ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामपंचायतींचा कारभार देण्याच्या सूचना पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. - संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT