ग्रामपंचायतींना मिळाला कृषी कक्ष
ग्रामपंचायतींना मिळाला कृषी कक्ष 
मुख्य बातम्या

ग्रामपंचायतींना मिळाला कृषी कक्ष

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील साडेअकरा हजार कृषी सहायकांना अखेर हक्काची जागा मिळणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘कृषी कक्ष’ उपलब्ध करून देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.  कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कामकाजाची सूत्रे स्वीकारताच सर्वप्रथम कृषी सहायकांची समस्या सोडविण्याचा निर्धार केला होता. “प्रत्येक ग्रामपंचायतीत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यासाठी कक्ष असावा. तेथे कृषी सहायकांना टेबल, खुर्ची, कपाट असे कार्यालयीन साहित्य मिळावे,” अशी सूचना डॉ. बोंडे यांनी मांडली होती.   कृषी सहायकांना यामुळे हक्काची जागा मिळाली असून या कक्षात फलक लावला जाणार आहे. त्यावर कृषी कर्मचाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, कामाचे दिवस आणि वेळ देखील नमूद केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. कृषी सहायकांना मिळालेली ही एकप्रकारची दिवाळी भेट आहे, अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.  राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामंपचायतींमध्ये किमान १५० ते २०० चौरस फुटाची जागा कृषी विभागाला तात्काळ देण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांकडून पाठपुरावा केला जाणार आहे.  ग्रामपंचायतींमध्ये जागा मिळताच तेथे कक्ष उभारणीसाठी साहित्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे सोपविली आहे. सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली या उपक्रमाचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.    “गावपातळीवर कृषी सहायकांना जागा मिळताच फर्निचरची व्यवस्था आयुक्तांनी करावी. कृषी सहायकांचे वेळापत्रक तयार करून ग्रामपंचायतीमध्ये लावावे. हेच वेळापत्रक जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवरदेखील प्रदर्शित करावे,” असेही आदेश शासनाने दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT