Gram sowing 45 thousand hectares in Nanded district
Gram sowing 45 thousand hectares in Nanded district  
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची ४५ हजार हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन

नांदेड :जिल्ह्यात चालू आठवड्यामध्ये रब्बी हंगामातील पेरणीने गती घेतली आहे. बुधवार (ता.२७) पर्यंत एकूण ५१ हजार ६६५ हेक्टरवर (३७.७९ टक्के) पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रामध्ये ४५ हजार ११७ हेक्टरवरील हरभऱ्याचा समावेश आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३६ हजार ७१२ हेक्टर आहे. यामध्ये ज्वारीचे २६ हजार ९७५ हेक्टर, गव्हाचे ३८ हजार ५३८ हेक्टर, मक्याचे ३ हजार १७६ हेक्टर, हरभऱ्याचे ६२ हजार ३५९ हेक्टर, करडईचे ४ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र आहे.

यंदा ऑक्टोबर महिन्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरिपाची सुगी रखडली. तणकटाची वाढ झाल्यामुळे पेरणीसाठी जमीन तयार करण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे पेरणीसाठी विलंब होत आहे. यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आजवर ४५ हजार ११७ हेक्टरवर (७२.३५ टक्के) पेरणी झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बुधवार (ता. २७) पर्यंतचे पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक पेरणी क्षेत्र  टक्केवारी
ज्वारी २६०२ ९.६५
गहू २४६४  ६.३९
हरभरा ४५११७ ७२.३६
करडई ४७४ ९.९४
मका ६४२  २०.२०
सूर्यफूल २५ २६५.९६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT