Gram on 1.5 lakh hectares in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर हरभरा

नांदेड: यंदाचा समाधानकारक पाऊस आणि प्रकल्पात असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ९२ हजार १८० हेक्टरनुसार १३७.०५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

टीम अॅग्रोवन

नांदेड : ‘‘यंदाचा समाधानकारक पाऊस आणि प्रकल्पात असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ९२ हजार १८० हेक्टरनुसार १३७.०५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात हरभऱ्याची पेरणी एक लाख ५४ हजार १९ हेक्टरवर झाली आहे’’, अशी माहिती अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.  

जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे झालेले नुकसान भरून निघावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी रब्बी पिकाखालील क्षेत्र या वर्षी तीन लाख हेक्टरवर वाढविण्यासाठी नियोजन केले होते. कृषी विभागाने रब्बीसाठी लागणाऱ्या बियाणे तसेच खतांचे नियोजन केले होते.

जिल्ह्याचे रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र एक लाख ४० हजार हेक्टर एवढे आहे. तर, यात हरभरा पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्र ८८ हजार हेक्टर आहे. आजपर्यंत सरासरीच्या १३७ टक्केनुसार एक लाख ९२ हजार १८० हेक्‍टरवर रब्बीमध्ये पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक एक लाख ५४ हजार १९ हेक्टरवर हरभरा पेरला आहे.

यासोबतच रब्बी ज्वारी २१ हजार ४०६ हेक्टर, गहू ११ हजार ४६१ हेक्टर, रब्बी मका एक हजार ५७६, करडई दोन हजार ३२१, रब्बी तीळ सहा, जवस नऊ हेक्टरवर झाल्याची माहिती चलवदे यांनी दिली. 

शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून जास्त क्षेत्रावर रब्बी पिकाची पेरणी करावी. उन्हाळी हंगामात उन्हाळी ज्वारी भुईमूग या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करावी, असे आवाहन चलवदे यांनी केले.

सध्या जिल्ह्यासह लगतच्या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह बागायती पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे. - रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड. 

पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

हरभरा १,५४,१९
गहू ११,४६१ 
रब्बी ज्वारी २१,४०६
रब्बी मका १,५७६ 
करडई  २,३२१
एकूण १,९२,१८० हेक्टर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: 'तृणमूल काँग्रेस'चं नाव, चिन्ह गोठवलं; ममतांच्या पक्षाला ‘फुटबॉलपटू’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी ३,८३६ मतदार

Farmers Protest : पीक पंचनामा मुद्द्यावर सटाण्यात तहसीलदारांना घेराव

Mohapada Encroachment : मोहपाडा अतिक्रमणप्रश्नी उपग्रह प्रतिमांचा आधार

Dried Sugarcane Crops : करपलेल्या उसात जनावरे सोडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT