ration card
ration card 
मुख्य बातम्या

केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्‍या दरात धान्‍य 

टीम अॅग्रोवन

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी संपूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर मे व जून महिन्‍यांकरिता अंत्‍योदय अन्‍न योजना व अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्‍या उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्यात येणार आहे. शनिवारपासून (ता.२५) रास्‍तभाव धान्‍य दुकानातून सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करण्‍यात येणार आहे, अशी माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

शनिवारपासून (ता.२५) मे महिन्‍याचे धान्‍य दुकानातून उपलब्‍ध होणार करून देण्यात आले आहे. गहू ८ रुपये प्रति किलो, तांदूळ १२ रुपये प्रति किलो या दराने प्रति व्‍यक्‍ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ वितरित करण्‍यात येणार आहे. पुणे शहरात केशरी शिधापत्रिकांची संख्‍या सुमारे ४ लाख ६० हजार असून लाभार्थी संख्‍या सुमारे २० लाख आहे. पिंपरी-चिंचवडमध्‍ये हीच संख्‍या २ लाख ६५ हजार असून लाभार्थी संख्या सुमारे १० लाख इतकी आहे. मे महिन्‍याकरिताचा ३८८७ टन गहू व २५७२ टन तांदूळ स्‍वस्‍त धान्‍य दुकानामध्‍ये पोहोच करण्‍यात आलेला आहे. 

हे धान्‍य केवळ उर्वरित केशरी रेशनकार्ड धारकांनाच वाटप करण्‍यात येणार आहे. अंत्‍योदय व अन्‍नसुरक्षा लाभार्थ्‍यांना मे महिन्‍याचे धान्‍य वाटप ५ मे पासून करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. रास्‍तभाव दुकाने पोलिसांच्‍या सूचनांप्रमाणे पूर्ण वेळ सुरु राहतील, दुकानांत उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्या धान्‍याचे वितरण लाभधारकांना ३१ मेपर्यंत करण्‍यात येणार असल्याने धान्‍य घेण्‍यासाठी गर्दी करु नये, रेशनकार्ड धारकांच्‍या तक्रार निवारणासाठी दूरध्‍वनी क्रमांक उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहेत. टोल फ्री क्रमांक १०७७, मदत केंद्र क्रमांक ०२०-२६१२३७४६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.  टोकन पद्धतीने धान्‍याचे वाटप  केशरी कार्डधारकांना धान्‍य वाटप करण्‍यासाठी स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांनी निर्धारित वेळापत्रक तयार केले आहे. कार्डधारकांना टोकन पद्धतीने धान्‍याचे वाटप करण्‍यात येणार आहे. सर्वप्रथम सकाळी निर्धारित वेळेचे टोकन कार्डधारकांना वाटप करण्‍यात येईल. त्‍यानुसार दिलेल्‍या वेळेतच दुकानामध्‍ये जाऊन धान्‍य घ्‍यावे. लाभार्थ्‍यांनी धान्‍य घेताना सामाजिक अंतर ठेवावे आणि मास्‍कचा वापर करावा, असे आवाहन अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT