दूध पावडर
दूध पावडर  
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांकडून घेतलेल्याच दुधाची भुकटी केली का?

Chandrakant Jadhav

जळगाव ः राज्यात प्रतिदिन सहकारी व इतर प्रमुख दूध संघ, संस्था १० लाख लीटर अतिरिक्त ठरणाऱ्या गायीच्या दुधाची भुकटी तयार करतात. या भुकटीसंबंधी शासनाने प्रतिलीटर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. परंतु, कोट्यवधींचे अनुदान दीड महिन्यापासून रखडले आहे. दूध संघांनी हे अनुदान मागितले असता ज्या दुधाची भुकटी केली, ते दूध गायीचेच होते का? दूध शेतकऱ्यांकडूनच घेतले का? असा प्रतिप्रश्‍न शासकीय यंत्रणांनी दूध संघांना विचारला आहे. यामुळे हे अनुदान मिळण्याची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडेल, अशी स्थिती आहे.  दूधधंदा अडचणीत येत असतानाच दूध उत्पादकांना कमी दरांचा फटका बसल्याने शासनाने शेतकऱ्यांशी संबंधित नेते, संघटना यांच्या आंदोलनानंतर १ ऑगस्ट, २०१८ पासून गायीच्या दुधाला २५ रुपये प्रतिलीटर दर संघ व इतर खाजगी दूध संकलन करणाऱ्या संस्थांनी देण्याचे बंधनकारक केले. तसेच संघ, खासगी संस्थांमध्ये रोज अतिरिक्त ठरणाऱ्या गायीच्या दुधापासून जी भुकटी तयार केली जाईल, त्यासंबंधी शासन प्रतिलिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान देईल, असेही जाहीर केले. राज्यात तालुका व जिल्ह्यांचे सहकारी दूध संघ व इतर प्रमुख संस्था मिळून रोज १० लाख लीटर अतिरिक्त गायीच्या दुधाचे संकलन करून त्यापासून भुकटी करीत आहेत.  शासनाला रोज ५० लाख रुपये अनुदान दूध संघांना या भुकटीसंबंधी देय आहे. दर महिन्याला १५० कोटी रुपये अनुदान देय आहे. अर्थातच ही बाब लक्षात घेता मागील दीड महिन्याचे सुमारे २२५ कोटी रुपये अनुदान शासनाला देय आहे.  या अनुदानासंबंधी सहकारी दूध संघांनी शासनाला पत्र दिले, त्यावर शासनाने ज्या गायीच्या दुधाची भुकटी केली, त्याची सर्व सविस्तर माहिती मागविली आहे. तसेच जे दूध घेतले ते शेतकऱ्यांकडूनच घेतले का व ते गायीचेच होते का, असा प्रश्‍न केला आहे. दूध संघांकडे शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक नाहीत. दूध संघ दूधपुरवठादार सोसायटीला निश्‍चित दिवसांचे दुधाचे पैसे सोसायटीच्या बॅंक खात्यात जमा करतो. मग सोसायट्या हा निधी दूधपुरवठादार, दूध उत्पादकांना रोखीने देतात. ही बाब लक्षात घेता आता दूध संघांनी या अनुदानासंबंधी आता गायीचे दूध पुरविणाऱ्या सोसायट्यांमधील सभासद, दूध उत्पादकांचे बॅंक खाते क्रमांक गोळा करून ती माहिती शासनाला देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यात आणखी काही दिवस लागतील. मग शासन सर्व बाबींची माहिती मिळाल्यानंतर पडताळणी, तपासणी करील. यानंतर अनुदानाचा मार्ग मोकळा होईल. यात अनेक दिवस जातील, अशी स्थिती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT