Government's apathy threatens common man's health: Radhakrishna Vikhe 
मुख्य बातम्या

सरकारच्या अनास्थेने सामान्यांचे आरोग्य धोक्यात ः राधाकृष्ण विखे

सामान्य माणसाला कोणत्याही आरोग्य सुविधा मिळत नसल्याने, वणवण फिरण्याची वेळ आली आहे. नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले पुण्यातील वरिष्ठ पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हा शासकीय अनास्थेचाच बळी आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

नगर ः आघाडी सरकारचेच आरोग्य ठिकाणावर नसल्याने सामान्यांचे आरोग्य धोक्‍यात दिसते. कोरोनाबाबत आघाडी सरकारची फक्‍त चमकोगिरी चालली आहे. प्रत्यक्षात सामान्य माणसाला कोणत्याही आरोग्य सुविधा मिळत नसल्याने, वणवण फिरण्याची वेळ आली आहे. नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले पुण्यातील वरिष्ठ पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हा शासकीय अनास्थेचाच बळी आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील रहिवासी व पुण्यातील वरिष्ठ पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत. तसेच कोपरगाव येथील एका रुग्णालयानेही वेळेत दाखल करून घेतले नसल्याने रायकर यांचा मृत्यू झाला आहे. त्याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. त्याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, शासकीय यंत्रणेने (स्व.) पांडुरंग यांना उपचारांबाबत योग्य मार्गदर्शन व सहकार्य केले नाही. उपचाराच्या सुविधा नसणाऱ्या ठिकाणी त्यांना पाठविलेच कोणी, तेथेही पैशांसाठी त्यांची अडवणूक केली गेली, हे खेदजनक आहे. पुण्यातही त्यांना रुग्णवाहिका मिळू नये, ही व्यवस्थेची शोकांतिका आहे.

कोरोना संकटात आघाडी सरकारने केवळ मोठमोठ्या घोषणा केल्या. हॉस्पिटल व त्यातील बेडबाबत आकडेवारी जाहीर करून चमकोगिरी केली. प्रत्यक्षात सामान्यांना कोणत्याही आरोग्यसुविधा मिळत नाहीत. नगर जिल्ह्यात पत्रकारितेच्या माध्यमातून (स्व.) पांडुरंग यांनी समर्पित भावनेतून स्वत:ला झोकून देऊन काम केले. विविध विषयांची मांडणी करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.

दुर्दैवाने समाजासाठी धावणाऱ्या पत्रकारालाच उपचार मिळू नयेत, हे अतिशय दु:खद आहे. या पत्रकाराचे निधन हा शासकीय व्यवस्थेच्या अनास्थेचाच बळी आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली. दरम्यान ज्यांच्याकडून रायकर यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष झाले त्यांच्यावर कारवाई करावी आणि शासनाने त्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत करावी, अशी मागणी नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

NASAKA Sugar Factory : थकीत देण्यांवरून नासाका प्रशासनाच्या रडारवर

Rain Update: कडाक्याच्या उन्हानंतर पहाटेच्या पावसाने दिलासा

Gazette Mismatch : गॅझेटमधील नावे वेगळी, दगड वेगळ्याच ठिकाणी

SCROLL FOR NEXT