सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या शासकीय दुध डेअऱ्या गेल्या नऊ वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दुग्धव्यावसायिक खासगी संघाना दुध विक्री करीत आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे २२ हजार लिटर दुध संकलन केले. म्हशीच्या दुधाला सरासरी ४० ते ४२, तर गायीच्या दुधाला २५ रूपये दर दिला जातो. त्यातच एका दुध सकंलन करणाऱ्या संस्थेने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे २ कोटी रूपये थकविले आहेत.
दुध संकलनासाठी कणकवली येथे शासकीय दुध डेअरी कार्यरत होती. परंतु, या डेअरीकडे म्हणावे तितके कुणी लक्ष दिले नाही. त्यामुळे हळुहळु या डेअरीचे अस्तित्व सपंत गेले. परंतु २०११ पासून डेअरीने दुध संकलन बंद केले. सध्या जिल्ह्याचे दुध संकलन २२ हजार लिटर आहे. दरांबद्दल शेतकऱ्यांमध्ये सभ्रंम आहे. काही संघ म्हैशीच्या दुधाला ४० ते ४२ रूपये दर देतात. याशिवाय फॅटप्रमाणे त्यामध्ये वाढ देखील होते. तर, काही संस्था दुधाला ३८ ते ४० रूपये देतात. गायीच्या दुधाला सरासरी २५ रूपये दर दिला जातो. तर, काही संस्था २३ रूपये देखील दर देतात.
संकलन करणाऱ्या एका संस्थेने जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची दोन कोटीपेक्षा अधिक रक्कम थकविली आहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला, अद्याप त्या संस्थेकडून पैसे देण्याबाबत कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. पशुखाद्य, हिरवा चाऱ्यांच्या वाढलेल्या दरामुळे सध्या दुध संघ किवा दुध संस्थांकडून मिळणारा दर शेतकऱ्याला परवडत नाही. त्यामुळे शेतकरी ग्राहक शोधून दुध विक्री करताना दिसत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.