चांगल्या बियाणे कंपन्यांनाच शासनाने प्रोत्साहन द्यावे : डॉ. सी. डी. मायी
चांगल्या बियाणे कंपन्यांनाच शासनाने प्रोत्साहन द्यावे : डॉ. सी. डी. मायी 
मुख्य बातम्या

चांगल्या बियाणे कंपन्यांनाच शासनाने प्रोत्साहन द्यावे : डॉ. सी. डी. मायी

टीम अॅग्रोवन

जळगाव : आपल्याकडे फक्त काही कपाशी बियाणे उत्पादक कंपन्या चांगले बियाणे उत्पादन करतात. पण सुमारे ५०० बीटी व इतर कपाशी बियाणे उत्पादक कंपन्या बाजारात आहेत. यात गोंधळ होत असून, केवळ चांगल्याच बियाणे उत्पादक कंपन्यांना शासनाने प्रोत्साहन, परवाने दिले पाहीजे, असे मत कपाशी पिकाचे शास्त्रज्ञ, अभ्यासक डॉ. सी. डी. मायी यांनी बुधवारी (ता. १०) मुंबई येथे कपाशी निर्यातदार, व्यापारी व जिनर्स यांच्या बैठकीत मांडले.

महाराष्ट्रातील कपाशीचे पीक यंदा गुलाबी बोंड अळीने पुरते संकटात आले. या पार्श्‍वभूमीवर कपाशी व्यापारी, संस्था काय करू शकतात यासंबंधी मुंबई येथे हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन स्टेशन नजीकच्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सीएआय) कॉटन बिल्डिंगमध्ये ही बैठक दुपारी झाली. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने संयोजन केले. त्यात उत्तर महाराष्ट्रातील काही व्यापारी, जिनर्सही सहभागी झाले. बैठकीत सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा, कपाशी बाजारपेठेचे अभ्यासक सुरेश कोटक, विनय कोटक आदी उपस्थित होते.

पूर्वहंगामी कपाशी लावूच नका यंदा फेब्रुवारीपूर्वीच कपाशीचे पीक नष्ट करा. आणि पुढच्या हंगामात पूर्वहंगामी कपाशी लागवड टाळा. फवारणी लागवडीनंतर ८० दिवसांनी करा. गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण शक्‍य आहे आदी सूचना डॉ. मायी यांनी या बैठकीत केल्या.

सीएआय राबविणार अभियान आगामी कपाशीच्या हंगामासंबंधी या दोन महिन्यांनंतर महाराष्ट्रभर कपाशी पट्ट्यात गुलाबी बोंड अळीसंबंधी अभियान राबविले जाईल. त्यासाठी स्थानिक जिनर्स, शास्त्रज्ञ, शासकीय यंत्रणा, शेतकरी यांची मदत घेतली जाईल. गावोगावी मार्गदर्शनपर कार्यक्रम, पत्रके वितरित केले जातील. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती कपाशी किंवा गाठींचे निर्यातदार दिनेश हेगडे यांनी ॲग्रोवनशी बोलताना दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT