`बॅलन्स`अभावी शेतकऱ्याला दिलेला चेक झाला 'बाउन्स'
`बॅलन्स`अभावी शेतकऱ्याला दिलेला चेक झाला 'बाउन्स' 
मुख्य बातम्या

`बॅलन्स`अभावी शेतकऱ्याला दिलेला चेक झाला 'बाउन्स'

टीम अॅग्रोवन

अकोला ः अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्याला दिलेला १६ हजार रुपयांचा धनादेश शासनाच्या खात्यात पुरेसा पैसा नसल्याने बाऊन्स झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याला आता तरी त्याची रक्कम मिळेल का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. अकोला तालुक्यातील दहिगाव येथे एका शेतकऱ्याची पाच एकर शेती आहे. गेल्या वर्षात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. या शेतकऱ्याला १६ हजारांचा कॅनेरा बँकेचा धनादेश देण्यात आला होता. शेतकऱ्याने १६ मार्चला हा धनादेश स्वीकारत बँकेत वठवण्यासाठी टाकला. परंतु, शासनाच्या संबंधित खात्यात पुरेसा निधी नसल्याने हा धनादेश बाऊन्स झाला. शेतकऱ्याच्या मुलाने जवळपास २५ दिवसांनी बँकेकडे विचारणा केली तर असता त्याला धनादेश बाऊन्स झाल्याचे बँकेने सांगितले.  कोरोनामुळे तो बँकेत जाऊ शकला नव्हता. बँकेला संबंधित धनादेश परत मागितला तर सुरुवातीला तहसीलला पाठवला असल्याचे कळविण्यात आले. आता हा धनादेश तहसील कार्यालयाने परत बँकेकडे पाठवला आहे. बँकेने फोन करून चेक घेऊन जाण्याबाबत शेतकऱ्याला सांगितले. खात्यात पुरेसा निधी नसल्याबाबतचे पत्रही बँकेने दिले. हा धनादेश संबंधित शेतकऱ्याच्या मुलाने ताब्यात घेतला आहे. आता हा धनादेश तलाठ्याकडे द्या, असे त्याला सुचविण्यात आले. ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’ या प्रत्यक्ष अनुभव हा शेतकरी पुत्र घेत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना जी मदत दिल्या गेली त्यात जर अशा प्रकारचे चेक बाऊन्स झाले तर शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. पीकविमा व इतर मदतीमध्ये अशा अनेक चुका यापूर्वी उघड झालेल्या आहेत. चुकीचे परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागू नये यासाठी शासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. - मनोज तायडे,  शेतकरी जागर मंच, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT