उजनीवर उभारणार तरंगता साैरऊर्जा प्रकल्प
उजनीवर उभारणार तरंगता साैरऊर्जा प्रकल्प 
मुख्य बातम्या

उजनीवर उभारणार तरंगता साैरऊर्जा प्रकल्प

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील धरणांच्या पाण्यावर तरंगता साैरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न शासनाकडून सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून उजनी (जि. साेलापूर) धरणाच्या पाण्यावर १ हजार मेगावॉट क्षमतेचा साैरऊर्जा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली अाहे.  राज्यातील पारंपरिक ऊर्जानिर्मितीसाठी मर्यादा येत असल्याने अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे धाेरण राज्याने स्वीकारले आहे. याचात एक भाग म्हणून जमिनीपेक्षा राज्यातील धरण, नदी, समुद्राच्या पृष्ठभागावर तंरगते साैरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी माेठा वाव आहे. याचा विचार करून राज्यातील पहिला तरंगता साैरऊर्जा प्रकल्प उभारण्याची चाचपणी उद्याेग आणि ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने सुरू आहे. यासाठीच उजनी धरणावरील प्रकल्पासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रकल्पामुळे पर्यावरणावर हाेणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे, विविध विभागांकडून परवानग्या प्राप्त करणे, पाण्याच्या पातळीचा महिनानिहाय अभ्यास करणे, प्रकल्प उभारणीसाठी व्यवस्था उभारणे, प्रकल्पाशी निगडित सर्व बाबी, कामकाज, कार्यपद्धती, अमंलबजावणी बाबत निश्‍चिती करण्याचे काम करणार आहे.  साैरऊर्जा प्रकल्पामुळे पुणे आणि साेलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांना शाश्‍वत ऊर्जा या प्रकल्पामधून मिळणार आहे. शेतकऱ्यांना पारंपारिक ऊर्जेवर अवलंबून न राहता साैरऊर्जा सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे.  अशी आहे समिती 

  • अध्यक्ष - सतीश चव्हाण - संचालक (वाणिज्य) महावितरण
  • सदस्य - मुख्य अभियंता (स्टेट ट्रान्समिशन युनीट), मुख्य अभियंता (जलसंपदा, विशेष प्रकल्प, पुणे), पर्यावरण विभाग संचालक, अतिरिक्त महासंचालक (महाऊर्जा)
  • सदस्य सचिव - अधीक्षक अभियंता (महावितरण)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

    Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

    Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

    PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

    Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

    SCROLL FOR NEXT