पीकेव्ही हायब्रीड-२ कापूस वाणास केंद्राची मान्यता
पीकेव्ही हायब्रीड-२ कापूस वाणास केंद्राची मान्यता 
मुख्य बातम्या

पीकेव्ही हायब्रीड-२ कापूस वाणास केंद्राची मान्यता

टीम अॅग्रोवन

जिरायती शेतीसाठी वाण; २०१९ च्या हंगामात होईल उपलब्ध अकोला : अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली संकरीत कपाशी पीकेव्ही हायब्रीड-२ (बीजी २) या वाणास अखेर केंद्र शासनाने परवानगी दिली अाहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाबीज यांच्या संयुक्त प्रयत्नातून महिको मोन्सॅन्टोसोबत करार करून हा वाण विकसित करण्यात अाला आहे. यासंदर्भातील पत्र महाबीज व्यवस्थापनाला नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक अोमप्रकाश देशमुख यांनी दिली अाहे. पीकेव्ही हायब्रीड -२ या वाणामध्ये बीजी २ हे तंत्रज्ञान अंतर्भूत केल्यानंतर या वाणाला व्यावसायिक मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे पाठवण्यात अाले होते. त्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्र शासनाने परवानगी दिली अाहे. यामुळे हे वाण अाता सर्वत्र उपलब्ध होऊ शकणार अाहे. विशेषतः २०१९ च्या हंगामात हे बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी महाबीजने कार्यक्रम हातात घेतला अाहे. येत्या दोन ते तीन वर्षात राज्यासह विदर्भातील जिरायती क्षेत्राला उपयुक्त ठरणारे हे वाण सर्वत्र उपलब्ध झालेले असेल.  यापूर्वी परभणी येथील कृषी विद्यापीठाने विकसित केलेले नांदेड ४४ अाणि अाता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाने विकसित केलेले पीकेव्ही हायब्रीड २ हे वाण अतिशय कमी पाण्यात व हलक्या जमिनीत चांगले उत्पादन देऊ शकतात. रसशोषण करणाऱ्या किडीसह शेंदऱ्या बोंडअळीस हे वाण सहनशील असल्याचे सांगतिले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Production : हळद उत्पादन वाढीची सूत्रे

Mango Growing : आंबे पिकविण्याची स्वस्त, सुरक्षित पद्धत

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT