सुक्‍या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन'
सुक्‍या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन' 
मुख्य बातम्या

सुक्‍या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन'

टीम अॅग्रोवन

चिपळूण :  पावसाळ्यात हवीहवीशी वाटणारी सुकी मासळी खरेदीसाठी चिपळूणच्या सुक्‍या मासळी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे सुक्‍या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन' आले आहेत. 

पावसाळा सुरू झाला की चिपळूण तालुक्‍यातील शेतकरी शेतीपूर्व कामाला लागतात. पावसाळ्यात शेती हंगाम चालू झाल्यानंतर शेतकऱ्यांना बाजारात खरेदीसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तीन ते चार महिने पुरेल इतका मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्य अशा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करून त्याचा साठा करून ठेवतात. त्याचबरोबर विविध प्रकारची सुकी मच्छीही भरून ठेवतात. पावसाळा आधी केल्या जाणाऱ्या या चार महिन्यांच्या खरेदीला आगोट असे म्हणतात. यंदा पाऊस लवकर येणार असल्याचे संकेत मिळाल्याने शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये पूर्व मशागतीचे कामे सुरू केली आहेत. 

शेतकऱ्यांनी अगोटाच्या खरेदीला सुरवात केली आहे. अनेक गावांत आठवडी बाजारात मान्सूनपूर्व खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड उडताना दिसत आहे. महागाई असतानाही खरेदीसाठी गर्दी होत आहे. ग्रामीण भागात पावसाळ्यात गरजेच्या वस्तू मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंबरोबरच सुक्‍या मासळीची खरेदीही जोरदारपणे सुरू आहे.

सुक्‍या मासळीला ग्रामीण भागात मावरा असे म्हणतात.  गुहागरसह दापोली भागातील महिला सुके मावरे घेऊन चिपळूणला येतात. येथील आठवडा बाजारात आपली दुकाने थाटून सुकी मासळी विकतात. इतर दिवशी डोक्‍यावर टोपले घेऊन गावो गावी फिरून मासळी विक्री करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT