गोकुळ दूध संघ करणार जनावरांवर आयुर्वेदिक उपचार
गोकुळ दूध संघ करणार जनावरांवर आयुर्वेदिक उपचार 
मुख्य बातम्या

गोकुळ दूध संघ करणार जनावरांवर आयुर्वेदिक उपचार

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दुधाळ जनावरांना होणारे साथीचे तसेच इतर विशिष्ट प्रकारचे आजार दूर करण्यासाठी राज्यात  प्रथमच आयुर्वेदिक पद्धतीने उपचार सुरू केले आहेत. याकरिता संघाने कोल्हापूर आणि बंगलोर येथील आयुर्वेदिक विद्यापीठ (दि युनिव्हर्सिटी ऑफ ट्रान्स-डिसीप्लीनरी हेल्थ सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजी) सोबत करार केला आहे. याअंतर्गत आत्तापर्यंत गोकुळ दूध संघाच्या ३२ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बेंगलोर येथे प्रशिक्षण दिले आहे.   या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अवतीभोवती सहज उपलब्ध असणारे कोरफड, तुळस, शेवगा, कडुनिंब, कडीपत्ता, मेहंदी, वड, पिंपळ, उंबर इत्यादी प्रकारच्या वनस्पती आणि स्वयंपाक घरात उपलब्ध असणारे गूळ, हळद, काळीमिरी, लसूण, कांदा, नारळ, चिंच, जिरे, धणे, हिंग, मेथी, वेलदोडा, दालचिनी, खडीसाखर अशा वस्तूंचा वापर करून जनावरांना कोणत्याही दुष्परिणामाशिवाय घरच्या घरी उपचार करता येणार आहेत. लाळ खुरकत, स्तन ग्रंथीमधील सूज म्हणजे मस्टायसीस, आतड्याचा दाह अर्थात आंत्रशोय, स्तनशोय, स्तनावरील पुरळ, गर्भाशय संक्रमण, तसेच आम्लपित्त, पोटातील वात, ताप, हगवण शरीरावरील जखमा अशा अंदाजे १७ ते १८ प्रकारच्या विविध आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने कोणत्याही साइड इफेक्टशिवाय घरच्याघरी करणे शक्य झाले आहे. जनावरांनी घेतलेल्या आहार आणि औषधांचा परिणाम त्याच्या दुधावर होत असतो. जनावर आजारी पडल्यानंतर त्याला दिलेल्या किंवा वापरलेल्या अॅण्टीबायोटीक आणि इंग्रजी औषधांचे अवशेष दुधात उतरत असतात. त्याचे परिणाम मानवी शरीरावर होत असतात. परंतु, आयुर्वेदिक उपचार पद्धतीने जनावरे निरोगी राहतात त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि दुष्परिणाम होत नाहीत पर्यायाने दुधाची वाढ होते तसेच त्याची गुणवत्ता वाढते. यासाठी गोकुळ दूध संघाने याचा पुढाकार घेतला आहे. महिला स्वयंसेविकांना प्रशिक्षण  भविष्यात याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यासाठी गोकुळ दूध संघाच्या महिला नेतृत्व विकास कार्यक्रमातील महिला स्वयंसेविकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. प्रशिक्षित झालेल्या महिला गावपातळीवर काम करणारे महिला बचत गट आणि आहार संतुलन कार्यक्रमातील स्वयंसेविका इत्यादींना प्रशिक्षित करून जनावरांच्या विविध आजारांवर गावपातळीवरच औषध तयार करून त्याचा उपचारासाठी वापर करतील असे उद्दिष्ट ठेवले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT