दूध संकलन
दूध संकलन  
मुख्य बातम्या

पूरस्थितीमुळे 'गोकुळ’ने दूध संकलन थांबवले

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) महापुराची परिस्थिती पाहून दूध संकलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. ६) केवळ पन्नास टक्के दूध संकलन झाले. गावांचे मार्ग बंद झाल्याने दूध संघपर्यंत येऊ शकले नाही.

मंगळवारी संध्याकाळी व बुधवारी ‘सकाळ’चे संकलन बंद करण्यात आल्याचे दूध संघाच्या सूत्रांनी सांगितले. गोकुळ दूध संघामार्फत दररोज तीन ते चार लाख लिटर दूध पुणे, मुंबईच्या बाजारपेठेत विकले जाते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून दुधाच्या संकलनात घट होत आहे. सोमवारी दुधाच्या संकलनात एक लाखांहून अधिक लिटर ची घट झाली. मंगळवारी केवळ पन्नास टक्के दूध संकलित झाले. यामुळे संघाने हा निर्णय घेतला.

जोरदार पाऊस व वाढत्या पाण्यामुळे दुधाच्या संकलनात मोठी घट झाली. मार्ग बंद असल्याने अनेक गावांमध्ये दुधाचे संकलन करणाऱ्या गाड्य पोचू न शकल्यारने दूध संकलन ठप्प झाले. अजूनही जोरदार पाऊस असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्‍यता असल्याने दुधाच्या संकलनात आणखी घट होण्याची शक्‍यता विविध दूध संघांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT