Goat farming beneficial for strengthening economy: Minister Sunil Kedar
Goat farming beneficial for strengthening economy: Minister Sunil Kedar 
मुख्य बातम्या

अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी शेळीपालन फायदेशीर ः मंत्री सुनील केदार

टीम अॅग्रोवन

अकोला ः ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीसोबत शेळीपालनासारखा जोड व्यवसाय करणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. ते जिल्ह्यातील सांगवी मोहाडी येथे आयोजित बँक ऑफ कारखेडा या उपक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी बोलत होते. 

कारखेडा अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीद्वारा संचालित असलेल्या या उपक्रमाच्या सांगवी मोहाडी (अकोला) या शाखेचे उद्‍घाटन शनिवारी (२९ फेब्रुवारी) झाले. या वेळी महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आमदार नितीन देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बनसोडे, माजी आमदार हरिदास भदे, बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, नरेंद्र देशमुख, संचालक के. जी. देशमुख, मनोहरराव डहाके, ॲड. शाम वक्ते, किशोर पागृत, विजय देशमुख यांची प्रमुख  उपस्थिती होती.

श्री. केदार म्हणाले की, शेतकऱ्यांना गोट बँकसाठी सेंटर तयार करण्यासाठी शासनाकडून ५० टक्के सबसिडी देण्यात येईल. शेतकऱ्यांनी बकरीच्या दुधापासून चीज तयार करावे. त्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेळीपालनासोबत कुक्कुटपालनासारखे व्यवसाय शेतकऱ्यांनी करावेत. शासन या सर्व कामासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.

महिलांना सक्षमीकरणासाठी माविमच्या बचत गटाच्या माध्यमातून गोट बँक ऑफ कारखेडा हा उपक्रम राबविण्यात यावा. यासाठी महिला व बालविकास विभाग सर्व प्रकारची मदत करेल, असे प्रतिपादन महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र देशमुख यांनी केले. डॉ. सुकेश झंवर यांनीही मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT