पुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच मक्यावरील लष्करी अळी ही जागतिक समस्या झाली आहे. अन्न आणि कृषी संघटनेचा कृतिशील कार्यक्रम, आफ्रिका, अमेरिका खंडातील देशांकडून रासायनिक, जैविक उपायांचा उपयोग, संशोधन, मार्गदर्शनपर पोर्टल, संकेतस्थळे, ॲप्स आदींचा वापर याद्वारे ही कीड नियंत्रणात ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न अन्य देशांसाठी अनुकरणीय ठरले आहेत. स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा अर्थात मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी (FAW) ही जागतिक समस्या झाली आहे. मका हे या अळीचे मुख्य पीक आहे. त्याचबरोबर ऊस, ज्वारी आदी पिकांतही या किडीचे अस्तित्व आहे. मका हे मुख्य पीक असलेल्या आफ्रिकी व दक्षिण अमेरिकी देशांत या अळीच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपक्रम राबवण्यात आले आहेत. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. बी. भेदे म्हणाले की, अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) या किडीच्या नियंत्रणात महत्त्वाचा पुढाकार घेतला. आफ्रिका खंडातील देशातील संबंधित संस्थांना एकत्रित आणून अळीच्या नियंत्रण व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला. यासंबंधीच्या विविध प्रकल्पांत सहा मुख्य घटकांवर भर दिला आहे. यात ताबडतोब करावयाच्या शिफारशी व उपाययोजना, कमी कालावधीत करावयाचे संशोधन, संपर्क व प्रशिक्षण, सर्वेक्षण व त्वरीत ॲलर्ट, धोरण व नियमनात मदत आणि समन्वय या घटकांचा समावेश आहे. पोर्टलद्वारे जागृती
संयुक्त उपक्रमाद्वारे पुस्तिका ‘फीड दी फ्युचर’ या उपक्रमाद्वारे यूएसएआयडी ही आंतरराष्ट्रीय विकास संस्था, मेक्सिको येथील आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधारणा केंद्र (सीमीट), विकसनशील देशांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांची समूह संस्था ‘सीजीआयएआर’ तसेच ‘सीआरपी मेझ’ कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने याविषयीची पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली. ‘यूएसएआयडी’ ही संस्था ‘फीड दी फ्युचर’ या उपक्रमाद्वारे लष्करी अळीविषयी आफ्रिकी देशांतील शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे काम करते आहे. नियंत्रणाच्या पद्धती सांगून नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार करते आहे. विविध देशांतील शासन, संशोधन संस्थांच्या समन्वयातून अळीचे सर्वेक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी बळकटी येत आहे. शासकीय व खासगी संस्थांना एकत्रित आणून अळीच्या नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय संघटन करण्यामध्ये सीमीट संस्थेचा पुढाकार आहे, अशीही माहिती श्री. भेदे यांनी दिली.
ठळक बाबी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.