agriculture
agriculture  
मुख्य बातम्या

गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती स्थगिती द्या : कृषी सहायक संघटना

टीम अॅग्रोवन

अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव पातळीवर होणाऱ्या ग्रामसभा, शेतीशाळा, शेतकरी बैठकांना तात्पुरती स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी कृषी सहायक संघटनेने कृषी आयुक्तांकडे केली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामध्ये कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, अधिकारी व इतर कर्मचारी आजाराला बळी पडत आहेत. आजपावेतो राज्यात २०० कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधीत झाले आहेत. त्यात नऊ जणांचा मृत्यूही झाला. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. त्यामुळे कृषी विभागातील कृषी सहायक, अधिकारी, कर्मचारी भयभीत झालेले आहेत. 

गावपातळीवर होणाऱ्या ग्रामसभा, शेतकरी बैठका, मेळावे, प्रशिक्षण, शेतीशाळा इत्यादी कामे करीत असताना कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्या कुणीही कोरोनामुक्त आहे हे ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे सर्व कार्यक्रमांना स्थगिती देणे अपरिहार्य झाले आहे. जेथे पोकरा व इतर योजना लागू आहेत त्या ठिकाणी शेतीशाळा, मेळावे यांचे प्रमाण अधिक आहे. त्या भागात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व बाबींचा विचार करता काम करीत असताना सामाजिक अंतर पाळणे अशक्य होते. 

वरील कामे झूम मिटींग, वेबिनार, व्हाट्सअॅप, ई-मेल, फेसबूक लाईव्हद्वारे करता येणे शक्य आहे. किंबहुना इतर विभागात या पद्धतीने कामकाज सुरु आहे. ग्रामसेवक संघटनेने समूह संपर्काचे कार्यक्रम बंद करण्याबाबत ग्रामविभागास पत्राद्वारे कळविले आहे.  सोशल मिडियाचा वापर  सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाच्या योजनेची प्रचार व प्रसिद्धीद्वारे अंमलबजावणी करण्यास बांधील आहोत. तरी कोरोनाची परिस्थिती निवळेपर्यंत समूह संपर्काच्या कार्यक्रमांवर कृषी सहायक संघटना तात्पुरता बहिष्कार टाकत आहे, असेही संघटनेने आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT