Give the post of secretary of village level agriculture committee to agriculture department 
मुख्य बातम्या

ग्रामस्तर कृषी समितीचे सचिवपद कृषी विभागाकडे द्या

ग्रामपंचायतस्तर ग्राम कृषी समितीच्या स्थापनेपासूनच ‘न’चा पाढा सुरू झाला आहे. या समितीच्या सचिवपदाची जबाबदारी आमच्याकडे देऊ नका, अशी विनंती ग्रामसेवक संघटनेने ग्रामविकास व पंचायतराज खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे गुरुवारी (ता. १०) केली आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला ः राज्यात दोनच दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ग्रामपंचायतस्तर ग्राम कृषी समितीच्या स्थापनेपासूनच ‘न’चा पाढा सुरू झाला आहे. या समितीच्या सचिवपदाची जबाबदारी आमच्याकडे देऊ नका, अशी विनंती ग्रामसेवक संघटनेने ग्रामविकास व पंचायतराज खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे गुरुवारी (ता. १०) केली आहे.

ग्रामसेवकांकडे आधीच असलेला कामाचा ताण पाहता समितीचे सदस्य सचिवपद हे कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे द्यावे, अशी मागणीही केली आहे.

याबाबत ग्रामसेवक संघटनेने म्हटले की, शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत स्तर ग्राम कृषी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवक संवर्गाची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही बाब राज्यातील ग्रामसेवक संवर्गाला अतिरिक्त कामाचा ताण देणारी आहे. राज्यभर ग्रामविकास विभागाकडील अनेक कामे, योजना, अभियान, केंद्र-राज्य-जिल्हा परिषद स्तर विविध निधी विनियोग, महसूल, आरोग्य, कृषी, सहकार, गृह, वने आदी विभागांची कामे ग्रामसेवक संवर्गावर लादलेली आहेत. याचा ताण आधीच ग्रामसेवक सहन करीत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता या समितीचे सदस्य सचिव पद हे कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्याकडे देण्यात यावे. कृषी विभागाच्या योजना, निर्णय, तांत्रिक बाबी संबंधितांना माहिती असल्याने त्यांच्याकडूनच याचे काम होणे आवश्यक आहे. ग्रामसेवक फक्त सदस्य म्हणून कामकाज सहकार्य करतील.

शासनाने ग्रामसेवकांकडील कामांच्या जबाबदाऱ्या लक्षात घेता ही जबाबदारी कृषी विभागाकडे द्यावी. यादृष्टीने ग्रामविकास विभागाने बदल करणे आवश्यक आहे. कृषी समिती सदस्य सचिव काम आम्ही आदरपूर्वक नाकारत आहेत, असेही संघटनेने म्हटले आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्या स्वाक्षरीचे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविण्यात आले आहे.

गावस्तरावर कृषी विभागाचा कर्मचारी कार्यरत असतो. त्यांच्याकडे या समितीचे सचिवपद द्यावे. ग्रामसेवक समिती सदस्य म्हणून त्यांना सहकार्य करणारच आहेत. ग्रामसेवकांकडे आधीच कामाचा व्याप अधिक असल्याने हे सचिवपद कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना द्यावे, अशी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे. - प्रशांत जामोदे, राज्य सरचिटणीस, ग्रामसेवक संघटना, महाराष्ट्र राज्य

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Fake Seeds: अहिल्यानगरमध्ये बोगस कपाशी बियाण्यांचा गैरप्रकार; शेतकऱ्यांचे नुकसान, शासनाचे कडक कारवाईचे आश्वासन

Kharif Sowing : मराठवाड्यात ४५ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी

Mangrove Conservation : कांदळवन संवर्धनातून साकारतेय हरित अर्थव्यवस्था

Improved Crop Variety : महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसित पिकांचे सुधारित वाण

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ नव्हे, हा तर स्वार्थपीठ महामार्ग : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT