Give incentive grants to farmers immediately: BJP's demand 
मुख्य बातम्या

प्रोत्साहनात्मक अनुदान शेतकऱ्यांच्या तात्काळ द्या ः भाजपाची मागणी

कोल्हापूर : प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान जाहीर केले आहे. ते अद्याप मिळालेले नाही. शासन यावर काहीही बोलत नाही. हा प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय आहे. शासनाने जाहीर केलेले हे अनुदान तात्काळ संबंधित शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यावर वर्ग करावे, अशी मागणी शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान जाहीर केले आहे. ते अद्याप मिळालेले नाही. शासन यावर काहीही बोलत नाही. हा प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय आहे. शासनाने जाहीर केलेले हे अनुदान तात्काळ संबंधित शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यावर वर्ग करावे, अशी मागणी शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यामध्ये सप्टेंबर २०१९ पर्यत थकीत असलेली दोन लाख रूपयांपर्यतची कर्ज रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे नियमित कर्ज भरणे हा गुन्हा झाला का? अशी भावना या शेतकऱ्यांच्या मध्ये निर्माण झाली होती. म्हणून प्रामाणिक शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत मदत सरकारने जाहीर करावी.

या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. राज्यात साधारणपणे ४४ लाख ७० हजार व जिल्ह्यात साधारणपणे २ लाख २० हजार शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरणारे आहेत त्यांची रक्कम अंदाजे २५ हजार कोटी होते. मात्र, अद्याप याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारची पुढील कार्यवाही झालेली नाही.

आता तर सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे वक्तव्य सुद्धा केले जात नाही. त्यामुळे हे पैसे कधी मिळणार, अशी विचारणा शेतकऱ्यांकडून होत आहे. पुन्हा एकदा प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय शासनामार्फत होतो की काय अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली ही अनुदानाची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून त्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VAMNICOM : वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेला ‘त्रिभुवन’ विद्यापीठाची मान्यता

Krishi Mandal Office : नसरापुरातील कृषी मंडल कार्यालय बेपत्ता

NCPSP Mandal Yatra : ‘राष्ट्रवादी’ची आता मंडल यात्रा

Maharashtra Agriculture Minister : महायुती सरकारचे खाते बदल; राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Banana Farming : इंदापूरच्या शेतकऱ्यांची केळी पिकाला पसंती

SCROLL FOR NEXT