पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज द्या : जिल्हाधिकारी पी. शिवशंकर
पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज द्या : जिल्हाधिकारी पी. शिवशंकर 
मुख्य बातम्या

पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज द्या : जिल्हाधिकारी पी. शिवशंकर

टीम अॅग्रोवन

परभणी : पीक कर्जवाटपासाठी बॅंकांना दिलेल्या उद्दिष्टात वाढ करून उपयोग नाही. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करून उद्दिष्ट पूर्ण करावे. कोणताही पात्र शेतकरी पीककर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. शेतकऱ्यांना पेरणीसाठी दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दराने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहामध्ये जिल्हा खरीप हंगाम २०१९-२० च्या नियोजन आढावा बैठक झाली. या वेळी शिवशंकर बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराजा बी. पी., निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे, उपविभागीय कृषी अधिकारी सागर खटकाळे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक के. आर. सराफ, वनामकृवितील कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. यू. एन. आळसे आदी उपस्थित होते.

शिवशंकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी स्थितीमुळे आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळणे आवश्यक आहे. कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना, अन्य पात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप झाले पाहिजे. अन्यथा केवळ बॅंकांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढवून उपयोग नाही. कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या सादर कराव्यात."

या वेळी ममदे यांनी खरrप हंगामासाठी खते, बियाण्यांची मागणी, पुरवठा याबाबत सादरीकरण केले. पाटील यांनी प्रस्तावित खरिपाचे क्षेत्र, त्यादृष्टीने केलेले नियोजन, कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचे सादरीकरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT