बुलडाण्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार भरपाई द्या
बुलडाण्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार भरपाई द्या 
मुख्य बातम्या

बुलडाण्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार भरपाई द्या

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः कमी पावसामुळे जिल्ह्यात शासनाने यावर्षी दुष्काळ जाहीर केला. परंतु दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी अद्यापपर्यंत शासनाने कोणत्याही सुविधा उपलब्ध केल्या नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाने शेतकऱ्यांना ५० हजार रुपये नुकसानभरपाईची मागणी केली अाहे. याबाबत संग्रामपूर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. याही वर्षी सर्वच पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. शेतकऱ्यांना कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवावा, उसनवार घेतलेले पैसे कोठून परत द्यावेत, मुलांचे शिक्षण कसे करायचे असे अनेक प्रश्न भेडसावत अाहेत. शासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. 

गुराढोरांना चारा नाही पिण्याला पाणी नाही. बेरोजगारी वाढली असून तरुणांच्या हाताला काम नाही. बेरोजगार तरुणांसाठी शासनाने मुद्रा लोनची घोषणा केली; परंतु बेरोजगारांना उद्योग उभा करण्याकरिता बँका कर्ज देत नाहीत. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही म्हणून बँकांनी पीक कर्ज दिले नाही. 

बुलढाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर, शेगाव तालुके खारपाणपट्ट्यामधे येतात. या तालुक्यातील अनेकांना क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीचे आजार झाले. या आजारामुळे लोकांना आपले जीव गमवावे लागले. अनेक गावांमध्ये १४० गाव योजनेचे पाणी पोचत नाही. त्यामुळे लोकांना अजूनही क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. अशा परिस्थितीमधे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कर वसुली आकारून ही वसुली सक्तीची केली आहे. या शेतकऱ्यांना विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी किमान हेक्‍टरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी केली. या निवेदनावर युवा कार्यकर्ते रोशन देशमुख, मोहन पाटील, प्रशांत खोडे, योगेश मुरुख, नंदकिशोर बोडखे, उमेश बावस्कार, शेख असलम, महम्मद शहा, विवेक राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बुधवारी अांदोलन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना बुधवारी (ता. १९) स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT