गिरणा धरणाचा साठा ६५ टक्‍क्‍यांवर
गिरणा धरणाचा साठा ६५ टक्‍क्‍यांवर 
मुख्य बातम्या

गिरणा धरणाचा साठा ६५ टक्‍क्‍यांवर

टीम अॅग्रोवन

जळगाव ः गिरणा धरणाचा साठा वाढत असून, तो गुरुवारी (ता. ८) सकाळी सहा वाजता ५६.१६ टक्‍क्‍यांपर्यंत होता. या धरणात नाशिक भागातील हरणबारी, केळझर प्रकल्प, ठेंगोडा बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, गिरणाचा साठा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.  तापी नदीवरील मुक्ताईनगरनजीकच्या हतनूर प्रकल्पाचे २४ दरवाजे गुरुवारी सकाळी सहा वाजता पूर्ण उघडण्यात आले. सातपुडा पर्वत भागातील सुकी नदीला चांगले प्रवाही पाणी आले आहे. तसेच तापी नदीची पूरस्थिती कायम आहे. कुठेही शेती व गावांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेले नसल्याची माहिती मिळाली. तापी नदीवरील धुळे जिल्ह्यातील सुलवाडे बॅरेजचे २६, नंदुरबारमधील सारंगखेडा बॅरेजचे २६ व प्रकाशा बॅरेजचे २७ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील गिरणा, वाघूर, अंजनी आदी नद्यांना पूर आलेला नाही. धुळे जिल्ह्यातील पांझरा प्रकल्प १०० टक्के भरल्याने त्यातून विसर्ग सुरू असून, नदीला पूर आला आहे. सातपुडा पर्वत भागातील सुकी प्रकल्पातील सांडव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. हा प्रकल्प १०० टक्के भरेल, असे सांगण्यात आले. तर अभोरा, मंगरूळ हे प्रकल्पही १०० टक्के भरतील, अशी स्थिती आहे. यावलमधील मोर धरणाचा साठाही वाढला असून, धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतालगतच्या अनेर प्रकल्पाचे १० दरवाजे उघडल्याने नदीला पूर आला आहे.

विविध प्रकल्पांमधील साठा (टक्केवारी, गुरुवारी सकाळी सहापर्यंत)  गिरणा ५६.१६,  वाघूर ३२.६२, अभोरा ७६, गूळ ५०.४३, सुकी ५८.४१, मंगरूळ ६५.४९. जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर, धुळ्यातील पांझरा, जामखेडी, बुराई, नंदुरबारमधील दरा व रंगावली हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT