संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले लागवड रखडणार

टीम अॅग्रोवन

सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे महिन्यात उष्णतेत होत असलेल्या वाढीमुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरू होणारी आले लागवड यावर्षीही रखडणार आहे. आल्याच्या दरात होत असलेल्या सुधारणेमुळे मागील दोन वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यातील आले पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. 

अपुऱ्या पावसाचा इतर पिकांप्रमाणे आले पिकालाही फटका बसताना दिसत आहे. जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी आले लागवड करतात. मात्र, सध्या उष्णता वाढल्याने आले लागवड सुरू झालेली नाही. मागील तीन ते चार वर्षांपासून हीच परिस्थिती निर्माण झाल्याने आल्याच्या एकुण उत्पादनावर परिणाम झालेला आहे. या हंगामात नदीकाठी व कालव्याचे पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी आले लागवडीसाठी पूर्वमशागत सुरू झाली आहे. यामध्ये रोटर मारणे, बेड सो़डणे, खताची पेरणी करणे तसेच तयार बेडवर ठिबक टाकणे या कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात साधारणपणे २५०० हेक्‍टरवर आल्याची लागवड होते. मात्र मुहूर्तावर यातील सुमारे ५ ते १० टक्के क्षेत्रावरदेखील आल्याची लागवड  झाली नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

आले उत्पादक शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. सध्या तापमान वाढले आहे. वाढलेल्या तापमानामुळे लागवड केलेल्या आल्याची उगवण उशिरा होते. तसेच उत्पादनावर परिणाम होतो. सध्या संथ गतीने सुरू असलेली आले लागवड जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात गतीने होणार आहे. मात्र, पावसाचे आगमन उशिरा झाल्यास आले लागवड पुढे धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. उशिरा आले लागवड झाल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम असतो. 

  • आले पिकाचे सध्याचे दर  : विक्रीचे आले प्रतिगाडी (५०० किलो) ः ३८ ते ४० हजार रुपये 
  •   आले पिकाकडे कल वाढला मागील वर्षापासून आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीही दर टिकून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, आले लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र, बियाण्यांचे दर प्रतिगाडीस ३५ हजारांवर गेल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. बियाण्यांच्या वाढलेल्या दरामुळे आले पिकाच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ होणार नसली, तरी शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होईल.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

    MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

    Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

    Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

    Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

    SCROLL FOR NEXT