कारखाना
कारखाना  
मुख्य बातम्या

साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांना समज द्या

टीम अॅग्रोवन

मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना वित्तपुरवठा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांना राज्य शासनाने कडक शब्दात समज द्यावी, असा ठराव ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत झाला. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. १७) ही बैठक झाली. या बैठकीला जलसंधारणमंत्री तानाजी सावंत, सहकार विभागाच्या सचिव आभा शुक्ला, कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.  तीन टप्प्यात वाहतूक खर्च करावा, या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि कारखाने देत असलेल्या रेकॉर्डची माहितीची सत्यता तपासण्यासाठी शासकीय यंत्रणा उभी करावी, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असावा, अशी सूचना बैठकीत करण्यात आली. गूळ कारखाने तसेच खांडसरी गूळ पावडरनिर्मितीसाठी गाळप केलेल्या उसालाही एफआरपीच्या कक्षेत आणावे, अशी सूचना काही सदस्यांनी केली.  बैठकीला शिवानंद दरेकर, पांडुरंग थोरात, भानुदास शिंदे, महेमूद पटेल, कारखाना प्रतिनिधी धर्मराज काडादी, श्री. शेटे आदी उपस्थित होते. बैठकीतील सूचना...

  • कामगारांची ने-आण करणे, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, बैलगाडी देखभाल व दुरुस्ती, स्लिप बॉय मदतनीस यांचे वेतन आदी खर्च तोडणी-वाहतूक खर्चात न पकडता व्यवस्थापन खर्चात समाविष्ट करावा. आरएसएफची थकीत बाकी ठेवणाऱ्या कारखान्यांवर आरआरसीची कारवाई करावी, अशी मागणी प्रल्हाद इंगोले यांनी केली. 
  • कारखान्यांकडून होत असलेली काटामारी रोखण्यासाठी सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासावेत, अशी मागणी विठ्ठल पवार यांनी केली
  • अनेक वर्षे उत्पादन देईल अशा उसाच्या नव्या जातींचे संशोधन करावे, अशी सूचना पांडुरंग शिंदे यांनी केली. 
  • आरआरसी कारवाईच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना कालमर्यादा ठरवून द्यावी, ऊस तोडणी यंत्रधारकांच्या थकीत अनुदानाचा प्रश्न शासनाने लवकर निकाली काढावा अशी विनंती करण्यात आली.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

    Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    SCROLL FOR NEXT