Garlic incoming in Nashik is low, Rs. 8500
Garlic incoming in Nashik is low, Rs. 8500 
मुख्य बातम्या

नाशिकमध्ये लसणाची आवक कमी, ८५०० रूपये दर

टीम अॅग्रोवन

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज मंगळवार (ता.२६) ते गुरुवार (ता.२८ मे) या कालावधीत बंद होते. शुक्रवार (ता.२९) आवक अत्यंत कमी होती. समितीचे कामकाज शनिवार (ता.३०) पासून सुरळीत झाले आहे. लसणाची आवक १४२ क्विंटल झाली. त्यास किमान ३५००, तर कमाल ११००० रूपये प्रतिक्विंटल दर होते. सर्वसाधारण दर ८५०० इतके राहिले. 

बाजार समितीमध्ये फळ भाज्यांच्या वर्गवारीत टोमॅटोची आवक ६६७ क्विंटल झाली. त्यांना किमान ३५०, तर कमाल १००० रूपये प्रतिक्विंटल दर होते. सर्वसाधारण दर ७०० इतके राहिले. वांग्यांची आवक १६० क्विंटल झाली. त्यास किमान २२५०, तर कमाल ३१५० प्रतिक्विंटल दर होते. सर्वसाधारण दर २६०० इतके राहिले.

फ्लॉवरची आवक ६२५ क्विंटल झाली. त्यास किमान ५००, तर कमाल १०३५ रूपये प्रतिक्विंटल दर होते. सर्वसाधारण दर ८९० इतके राहिले. कोबीची आवक ८४५ क्विंटल झाली. तिला किमान २५०, तर कमाल ५४० प्रतिक्विंटल दर होते. सर्वसाधारण दर ३७५ इतके राहिले. ढोबळी मिरचीची आवक १२५ क्विंटल, तर दर २५०० ते ४००० रूपये होते. सर्वसाधारण दर ३१२५ रूपये इतके राहिले

.  वेलवर्गीय भाज्यांमध्ये भोपळ्याची आवक २७५ क्विंटल, दर ६६५ ते १५०० रूपये प्रतिक्विंटल दर होते. सर्वसाधारण दर १००० इतके राहिले. कारल्याची आवक २६५ क्विंटल झाली. त्यास किमान १६७०, तर कमाल २५०५, सर्वसाधारण दर २०८५ इतके राहिले. दोडक्याची आवक ८ क्विंटल, तर दर किमान २५००, कमाल ३३३५, सर्वसाधारण २९१५ रूपये राहिले.

वालपापडीची आवक १२२ क्विंटल, तर दर किमान २०००, कमाल ४४००, सर्वसाधारण ३५०० रूपये राहिले. घेवड्याची आवक अवघी १० क्विंटल, तर दर किमान ६०००, कमाल ८५००, सर्वसाधारण ७००० रूपये राहिले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर आवक ७५००० जुड्या झाली. त्यास प्रत्येकी १०० जुड्यांना किमान २०००,कमाल ७५०० हजार दर मिळाला.सर्वसाधारण दर ४००० होते.मेथीची आवक ६२०० जुड्या झाली.त्यास प्रत्येकी १०० जुड्यांना किमान १००० कमाल ४५०० हजार दर मिळाला.सर्वसाधारण दर ३५०० होते.

पालकाची आवक ६०० जुड्या झाली. त्यास प्रत्येकी १०० जुड्यांना किमान ३००, कमाल ७०० हजार दर मिळाला. सर्वसाधारण दर ५०० होते. तर कांदापातीची आवक ३८०० जुड्या झाली. त्यास प्रत्येकी १०० जुड्यांना किमान १०००,कमाल ५००० हजार दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५०० होते.  डाळिंबांची २६८ क्विंटल आवक 

फळांमध्ये डाळिंबांची आवक २६८ क्विंटल झाली. त्यात आरक्ता वाणास किमान ४५०, तर कमाल ४७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३०० मिळाला. तसेच मृदुला वाणास किमान ५५०, तर कमाल १०२५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७००० रूपये मिळाला. टरबुजाची आवक ४६० क्विंटल झाली. त्यांना किमान ५००, तर कमाल ९०० प्रतिक्विंटल दर होते. सर्वसाधारण दर ७०० इतके राहिले. खरबुजाची आवक १२० क्विंटल झाली. त्यांना किमान ७००, तर कमाल १५०० प्रतिक्विंटल दर होते. सर्वसाधारण दर १००० रूपये राहिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT