जिहे-कटापूर योजनेसाठी केंद्रातून निधी मिळणार Funds will be provided by the Center for Jhee-Katapur scheme 
मुख्य बातम्या

जिहे-कटापूर योजनेसाठी केंद्रातून निधी मिळणार

जिहे-कटापूर या महत्त्वाकांक्षी योजनेस केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नुकतेच ५३७ कोटी रुपये दिले असून, ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाकडून आवश्यक तो निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री शेखावत यांनी दिले

टीम अॅग्रोवन

सातारा : माण खटाव तालुक्याच्या विकासात भर घालणाऱ्या जिहे-कटापूर या महत्त्वाकांक्षी योजनेस केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने नुकतेच ५३७ कोटी रुपये दिले असून, ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाकडून आवश्यक तो निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिले. या योजनेच्या पूर्ततेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. 

या वेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, ‘‘जिहे-कटापूर या योजनेमुळे २७,५०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, या योजनेमुळे माण खटाव तालुक्यातील ६७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे. या योजनेमुळे या ६७ गावांमधील सुमारे २७,५०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. 

योजना परिसरातील दुष्काळ निवारणास उपयुक्त ठरणार आहे. याआधी महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्पासाठी केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र काही प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्रातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू  आहेत.’’

 या वेळी शिवकालीन तळ्यांचा पुनर्विकास करण्याबाबत केंद्रीय मंत्री शेखावत यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यात सुमारे २० गड किल्ले असून, यातल्या अनेक गड किल्ल्यांवर शिवकालीन तळी अस्तित्वात आहेत. या शिवकालीन तळ्याचा जीर्णोद्धार करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात खासदार उदयनराजे यांनी मंत्री शेखावत यांच्याशी चर्चा केली. 

या वेळी बोलताना शेखावत यांनी या सर्व किल्ल्यांवरील जलस्रोतांचा अभ्यास करून त्या संदर्भात कोणत्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देता येईल, या बाबत प्रशासकीय पातळीवर माहिती घेऊन विशेष निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहितीही खासदार भोसले यांनी दिली आहे..

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Election Commission: 'तृणमूल काँग्रेस'चं नाव, चिन्ह गोठवलं; ममतांच्या पक्षाला ‘फुटबॉलपटू’ चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी ३,८३६ मतदार

Farmers Protest : पीक पंचनामा मुद्द्यावर सटाण्यात तहसीलदारांना घेराव

Mohapada Encroachment : मोहपाडा अतिक्रमणप्रश्नी उपग्रह प्रतिमांचा आधार

Dried Sugarcane Crops : करपलेल्या उसात जनावरे सोडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT