devendra-Fadnavis
devendra-Fadnavis 
मुख्य बातम्या

फडणवीस यांचे वर्चस्व अबाधित 

टीम अॅग्रोवन

मुंबई: विधानपरिषदेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचे पत्ते भाजपने साफ केले आहेत. उमेदवारी नाकारल्याने पक्षातील जुन्या नेत्यांचे महत्त्व कमी झाले असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रदेश भाजपवरील वर्चस्व अबाधित असल्याचा संदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी दिला आहे. 

फडणवीस सरकारमध्ये भोसरीतील जमीन घोटाळ्याच्या आरोपावरुन महसूल मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागल्यापासून एकनाथ खडसे हे पक्षात दुर्लक्षित आहेत. विधानसभा निवडणुकीतही त्यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या मुलीला तिकीट देण्यात आले होते. निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यानंतर त्याचे खापर त्यांनी पक्षातील नेत्यांवर फोडले होते. यावेळी खडसे यांनी विधानपरिषदेची उमेदवारी मागितली होती. 

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी बंडाचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर त्या पुन्हा सक्रिय झाल्या होत्या. विधानपरिषदेत सरकारच्या विरोधात संघर्ष करणारे धारदार नेतृत्व नाही. त्यामुळे पंकजा यांना विधानपरिषदेवर पाठवून विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, असे मुंडे समर्थकांना वाटत होते. मात्र, पंकजा मुंडेंच्या उमेदवारीचा विचार न झाल्याने समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे विधानपरिषदेच्या उमेदवारीकडे त्यांचे डोळे लागले होते. मात्र, खडसे, मुंडेंप्रमाणे या तीनही जणांच्या नावावर फुली मारण्यात आली. 

दिल्ली दरबारी फडणवीस यांचे वजन...  दरम्यान, भाजपच्या विधानपरिषद उमेदवारीच्या यादीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या दरबारी त्यांचे वजन असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. भाजपचे चारही उमेदवार हे फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना विधान परिषदेचा दरवाजा तूर्तास बंद करून फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पदावर गंडांतर येणार नाही याची काळजी घेतल्याचे बोलले जाते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT