संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

शिल्लक एफआरपी मिळत नसल्याने साताऱ्यातील शेतकरी अस्वस्थ

टीम अॅग्रोवन

सातारा  : अजिंक्यतारा कारखान्याचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कारखान्याने एफआरपी रक्कम पूर्ण दिलेली नाही. किमान विक्री मूल्यात वाढ करूनही उर्वरित एफआरपीची रक्कम देण्याबाबत कारखान्यांकडून कोणत्याही हालचाली दिसत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. 

जिल्ह्यातील गाळप हंगाम संपला असून, कारखान्यांनी एक कोटी क्विंटलपेक्षा अधिक साखरनिर्मिती केली आहे. सलग दुसऱ्या वर्षी साखर निर्मिती कोटीवर झाली आहे. हंगामाच्या मध्यावर साखरेच्या दरातील घसरण झाल्यामुळे एफआरपीसाठी ८०-२० चे सूत्र स्वीकारले होते. या काळात ऊस तुटून जाणे गरजेचे असल्यामुळे शेतकऱ्यांनी हे स्वीकारत कारखान्यांस ऊस दिला. त्यानंतर केंद्र शासनाने किमान विक्री मूल्य २९०० वरून ३१०० रुपये प्रतिक्विंटलवर नेले होते. या काळात साखरेची मागणी काहीशी कमी झाल्यामुळे कारखान्यांनी हाच दराचा फॉर्म्युला कायम ठेवला आहे. यामुळे पीककर्जाचे नवे जुने करण्यात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. हंगाम संपल्यावर उर्वरित एफआरपी मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती.

हंगाम उरकून जवळपास तीन आठवडे झाले आहेत. मात्र, अजिंक्यतारा कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यांकडून कधी व किती हप्ता मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. खरीप हंगाम तोंडावर आला असून, पुढील महिन्यात या हंगामाची कामे सुरू होतील. यामुळे उसाचा उर्वरित हप्ता मिळल्यास तो शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत बहुतांशी कारखानदार निवडणुकीत गुंतले होते. या मतदान झाले असल्याने उर्वरित एफआरपी देण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

अजिंक्यतारा कोंडी फोडणारा कारखाना जिल्ह्यातील २०१८-१९ हंगाम सुरू होताना प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत पहिली उचल म्हणून एकरकमी एफआरपीस मान्यता देणारा कारखाना अजिंक्यतारा आहे. यानंतर साखरेच्या दरात घसरण झाल्यावर ८०-२० सूत्र स्वीकारत याच कारखाने पहिली उचल प्रतिटन २३०० रुपये दिली होती. हाच फॉर्म्युला जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी स्वीकारला होता. नुकतेच अजिंक्यतारा कारखान्याने कोंडी फोडत शिल्लक एफआरपीची प्रतिटन ५१५ रुपये बँकेत जमा केली आहे. हाच आदर्श इतर कारखान्यांनी स्वीकारण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT