नाशिक परिमंडळातील ३० हजार शेतकऱ्यांचा वीजजोडण्यांचा मार्ग मोकळा
नाशिक परिमंडळातील ३० हजार शेतकऱ्यांचा वीजजोडण्यांचा मार्ग मोकळा 
मुख्य बातम्या

नाशिक : ३० हजार शेतकऱ्यांचा वीजजोडण्यांचा मार्ग मोकळा

टीम अॅग्रोवन

नाशिक : कोटेशन भरूनही कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या नाशिक परिमंडळातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्यूशन सिस्टिम) वीजजोडणी देण्यासाठी निविदा प्रक्रिया त्वरित राबविण्याचे आदेश मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिले आहेत.

या योजनेतून परिमंडळात जवळपास ७०० कोटी रुपयांची कामे होणार आहेत. एका जोडणीसाठी २ लाख ५० हजार रुपयांपर्यंतच्या खर्चाची तरतूद असून, १४ वीज उपकेंद्रांची उभारणीही प्रस्तावित आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ''एचव्हीडीएस''मधून होणाऱ्या कामांना गती देण्याच्या सूचना गुरुवारी दिल्या होत्या. १५ ऑगस्टपासून योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिमंडळ कार्यालयात आयोजित अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांच्या बैठकीत जनवीर यांनी शुक्रवारी हे आदेश दिले.

मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या राज्यभरातील अडीच लाख शेतीपंपांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे जोडणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून होणाऱ्या कामांचा नाशिक परिमंडळातील २९ हजार ९४१ शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. या योजनेत एक किंवा दोन कृषिपंप वीजजोडणीसाठी १०, १६ किंवा २५ किलो व्हाेल्टचे स्वतंत्र रोहित्र (डीपी) उभाण्यात येणार असल्याने वीजगळती व चोरीला आळा बसण्यास हातभार लागणार आहे. उपलब्ध मनुष्यबळाचा सुयोग्य वापर करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी व उपविभागनिहाय निविदा त्वरित काढाव्यात, असे आदेश जनवीर यांनी दिले आहेत.

...तर कारवाईला सामोरे जा! वीजबिलांची शंभर टक्के वसुली, वीजचोरीविरोधात कारवाई, थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडणे, नादुरुस्त मीटर बदलणे आदी कामे प्राधान्याने करावीत. या कामांबाबत लक्ष्य निर्धारित करून उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य उपयोग करावा. या कामांमध्ये कुचराई करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी; अन्यथा स्वतः कारवाईस तयार राहावे, असा इशारा जनवीर यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिला. या वेळी नाशिक शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील पावडे, मालेगाव मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता दरवडे, अहमदनगर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता जीवन चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

वीजजोडण्यांची सद्यःस्थिती नाशिक शहर मंडळ : नाशिक शहर विभाग दोन- ३५१, नाशिक ग्रामीण विभाग- २८२७९, चांदवड विभाग- २७६५ मालेगाव मंडळ : कळवण विभाग- २७१, मालेगाव विभाग- २३४०, मनमाड विभाग- ६३४६, सटाणा विभाग- २८७४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT