रशियाच्या तक्रारीनंतर द्राक्ष निर्यातदारांची कोंडी; १४ कंपन्यांचे परवाने निलंबित
रशियाच्या तक्रारीनंतर द्राक्ष निर्यातदारांची कोंडी; १४ कंपन्यांचे परवाने निलंबित 
मुख्य बातम्या

Grape Export : रशियाच्या तक्रारीनंतर द्राक्ष निर्यातदारांची कोंडी; १४ कंपन्यांचे परवाने निलंबित

टीम अॅग्रोवन

नाशिक : नाशिकमधून रशियात निर्यात झालेल्या ४१ कंटेनरमध्ये कीटक सापडल्याचा संशय व्यक्त करीत तेथील प्लांट क्वारंटाईन विभागाने ते नाकारल्यांनर भारतीय प्लांट क्वारंटाईन विभागानेही यासंबंधीत १४ निर्यातदार कंपन्या व संबंधित पॅकहाऊस यांच्यावर बंदी घातल्याचे समोर आले आहे. रशियाने केलेले कृत्य आणि म्हणणे ऐकून न घेता केंद्र सरकारने घातलेल्या बंदीमुळे जिल्ह्यातून होणारी एकूण ५० टक्के निर्यात ठप्प होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.   दरम्यान, निर्यातदारांनुसार ज्या किटकांबाबत रशियाने दावा गेला आहे, ती महाराष्ट्रात उपलब्धतच नसताना रशियाच्या तक्रारी अडून संपूर्ण निर्यातच वेठीस धरण्याचे प्रयोजन काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

२०१९-२०च्या द्राक्ष हंगामात भारतातून ८५०० कंटनेर युरोप व रशियात निर्यात झाले, त्यापैकी रशियात १५०० कंटेनर पाठविण्यात आले. यातील ४१ कंटेनर नाशिकमधून गेले होते. जिल्ह्यातील निर्यातदारांचे कामकाज अपेडा मान्यताप्राप्त आहे. द्राक्ष निर्यातीमध्ये कीटक सापडल्याचे रशियाच्या प्लांट क्वारंटाईन विभागाकडून भारतीय प्लांट क्वारंटाईन विभागाला कळविताच १४ निर्यातदारांचे परवाने तातडीने निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रत्यक्षात ज्या किटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. अशा प्रकारची किटके भारतात आढळून आली नसल्याचे भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे यांनी सांगितले.

श्री. खापरे यांनी याबाबत पुण्यातील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडे विचारले असता त्यांनीही आढळून येत नसल्याचे कळवले आहे. मात्र असे असताना संशयाच्या सुईचा आधार घेऊन सूचनेप्रमाणे घेतलेल्या या निर्णयामुळे रशियासह इतर देशात द्राक्ष निर्यात करण्यास बंदी घातल्याने संबंधित घटकांसमोर मोठ्या अडचणी येणार आहेत.  संशयाची सुई पुढे करून निर्णय? केंद्राच्या प्लांट क्वारंटाईन विभागाने हा निर्णय घेतला. मात्र असे असताना अपेडा व संबंधित घटकांना विचारात घेणे अपेक्षित होते, मात्र त्यांना याबाबत विचारात घेतले का नाही? किंवा निर्यातदार, विभागाचे प्रतिनिधी व राज्यातील कृषी विभाग यांच्या बुधवार (ता.३०) रोजीच्या बैठकीत का बोलावले नाही असा प्रश्न यानिमित्ताने द्राक्ष निर्यातदारांकडून उपस्थित होत आहे. ही किटके महाराष्ट्रात नाहीच ! मेगासेलिया स्केलरिज हे कीटक आणि सेराटिटीज कॅपिटाटा ही फळमाशी महाराष्ट्रात सापडत नसल्याचे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने पत्राद्वारे कळविले असल्याचे द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष श्री.खापरे यांनी सांगितले. मुळात ज्या किटकांचा उल्लेख करून संबंधितनिर्यातदार यांचे परवाने करण्यात आले. त्यामुळे आता त्यांना रशियासह ठिकाणी निर्यात करता येणार नाही. प्रत्यक्षात रशियापेक्षा युरोप व युकेमध्ये प्लांट क्वारंटाईन विभाग काटेकोरपणे काम करतो. मात्र असे नेहमी राशियातच का घडते याबाबत संशय व्यक्त होतोय. रशियातील प्लांट क्वारंटाईन विभागाला बोलावून भारतीय द्राक्ष निर्यातदारांचे निकषांप्रमाणे सुरू असलेले कामकाज दाखवून द्यावे, म्हणजे त्यांना कामाचे स्वरूप लक्षात येईल .- जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना  द्राक्ष निर्यातीच्या नियमानुसार द्राक्ष निर्यात होते. यामध्ये सर्व निकष पाळून कामकाज होत असताना असे निर्णय अडचणीचे आहेत. याची पाहणी करून व त्यांनंतर तपासणीनंतर असे निर्णय घेणे योग्य ठरले असते. मात्र सूचना प्राप्त होताच असे निर्णय घेणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार आहे. - मधुकर क्षीरसागर, द्राक्ष निर्यातदार -क्षीरसागर कोल्ड स्टोरेज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT