जिल्हा परिषद घेणार साडेसात हजार हेक्‍टरवर चारा उत्पादन
जिल्हा परिषद घेणार साडेसात हजार हेक्‍टरवर चारा उत्पादन 
मुख्य बातम्या

नगर झेडपी घेणार साडेसात हजार हेक्‍टरवर चारा उत्पादन

Sudarshan Sutaar

नगर ः चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे यंदा सात हजार ५९४ हेक्‍टर क्षेत्रावर चारा उत्पादन घेतले जाणार आहे. त्यातून सुमारे ३ लाख ४१ हजार ७५६ टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे देण्याचे नियोजन केले असून, त्यावर सुमारे एक कोटी ८२ लाख रुपये खर्च होणार आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवले असून १७ जुलै रोजी लाभार्थी निवड केली जाणार आहे.

नगर जिल्ह्याने यंदा गंभीर दुष्काळ सोसला आहे. दुष्काळात सर्वाधिक टंचाई चाऱ्याची भासली आहे. त्यामुळे जनावरे जगविण्यासाठी छावण्याचा आधार घ्यावा लागला. नगर जिल्ह्यामध्ये शेतीसोबत दूध व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. यंदा मात्र दुष्काळात केवळ चारा नसल्याने अनेक शेतकऱ्यांना दुभती जनावरे विकावी लागली. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने वैरण विकास योजनेतून चारा उत्पादनाला अधिक प्रधान्य दिले आहे. त्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी बिगर आदिवासी व कामधेनू दत्तक योजना आहे. अकोले तालुक्‍यातील ११६ आदिवासी गावांसाठी आदिवासी उपयोजना असून, या योजनेतून शेतकऱ्यांनी चारा उत्पादनासाठी बियाणे अनुदानावर मिळण्यासाठी अर्ज मागवले आहेत. १५ जुलै रोजी लाभार्थी यादी निश्‍चित होणार असून १७ जुलै रोजी लाभार्थी निवडी होणार आहेत.

मका, ज्वारी, बाजरी, न्युट्रोफेड (सुधारित गवत) यासाठी महाबीजच्या दरानुसार ४८ रुपये प्रतिकिलो बियाण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे. दोन गुंठ्यासाठी दोन किलो बियाणे दिले जाईल. उपलब्ध निधीनुसार सात हजार ५९४ हेक्‍टर क्षेत्रावर चारा उत्पादन होईल. त्यासाठी चारा उत्पादन घेतले जाणार आहे. ३ लाख ७९ हजार ७२९ किलो बियाणे लागणार आहे. प्रतिहेक्‍टर ४८ टनाच्या अंदाजानुसार त्यातून ३ लाख ४१ हजार ७५६ टन चारा उपलब्ध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आदिवासी उपयोजना योजनेतून लाभार्थ्यांना ६०० रुपयांपर्यंत तर सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना १५०० रुपयांपर्यंत लाभ दिला जाणार आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजना वाढवल्या जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ दिला जातो. यंदा आदिवासी उपयोजनेत शेळीगट, गाय गट, एकदिवसीय कोंबडी पिले, आदीवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी योजनेत दुभत्या जनावरांचे गट, शेळी गट, एक दिवसीय पिले, विशेष घटक योजनेतूनही शेळी, गाय गट व पशुखाद्य वाटप या योजना वाढवल्या आहेत.

योजना व त्यासाठी खर्च होणार निधी बिगर आदिवासी योजना ः १ कोटी ५० लाख कामधेनू दत्तक योजना ः २२ लाख २७ हजार आदिवासी उपयोजना ः १० लाख  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Market : आळेफाट्याच्या बाजारात १६५ गायींची विक्री

Urea Racket : युरिया रॅकेटविरोधात अखेर गुन्हा दाखल

Jowar Market : हमीभावापेक्षा कमी दराने विकतेय ज्वारी

Bhavantar Yojana : भावांतर योजनेचे गाजर

Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

SCROLL FOR NEXT