संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात चारा पिकांची ६८ हजार हेक्टरवर लागवड

टीम अॅग्रोवन

नगर  ः जिल्ह्यात यंदाच्या खरिपात ६८ हजार ६२२ हेक्टर क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली. पाऊस नसल्याने क्षेत्र कमीच आहे. परतीचा पाऊस चांगला झाला तर चारा पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दुष्काळामुळे व पाणी उपलब्ध नसल्याने गंभीर चाराटंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदा पावसाळ्यात चारा लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यंदाही दुष्काळग्रस्त तालुक्यांत पुरेसा पाऊस झाला नसल्याने चारा लागवडीच्या क्षेत्रात फारशी वाढ झालेली नाही.

यंदा खरिपात आत्तापर्यंत ६८ हजार सहाशे २२ हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड झालेली असून त्यात ३० हजार ८४३ हेक्टर क्षेत्रावर खरीप मका, १९,२९७ हेक्टर क्षेत्रावर खरीप कडवळ, १२४ हेक्टर क्षेत्रावर बाजरी, ७, ९२३ हेक्टर क्षेत्रावर लुसर्न घास, २६९० हेक्टर क्षेत्रावर नेपीयर ग्रास, ७७४५ हेक्टर क्षेत्रावर इतर चारा पिकांची लागवड केली आहे. अजून पुरेसा पाऊस नाही. परतीचा पाऊस जर चांगला झाला चारा लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

तालुकानिहाय लागवड क्षेत्र (हेक्टर) : नगर ः ४४६४, पारनेर ः ३३४६, श्रीगोंदा ः ५४३६, कर्जत ः ६१२३, जामखेड ः ११९३, शेवगाव ः १९४१, पाथर्डी ः ३३१३, नेवासा ः ७६६२, राहुरी ः ६५७४, संगमनेर ः ११,५३०, अकोले ः १४४८, कोपरगाव ः ४२५५, श्रीरामपूर ः २७५४, राहाता ः ८५८३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT