संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

अचलपूर, मोर्शी तालुक्‍यांत सुरू होणार चारा छावण्या

टीम अॅग्रोवन

अमरावती  ः जिल्ह्यात पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत अचलपूर, मोर्शी तालुक्‍यांत चारा छावण्या सुरू करण्यासोबत जिल्ह्यातून इतरत्र चारा वाहतुकीस जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये बंदी घातली आहे. 

जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाद्वारे शेकडो गावांमध्ये तत्काळ आणि विशेष पाणीपुरवठा योजनांचे प्रयत्न होत आहेत. त्याकरिता कोट्यवधी रुपयांचा आराखडादेखील तयार करण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारण्याचा कामात दिरंगाई करणाऱ्या दहा ग्रामपंचायतींना प्रशासनाकडून नोटीसही बजावण्यात आली आहे. सोबतच अंतिम उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील १९ गावांमध्ये २१ टॅंकरद्वारे नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी अशा व्यापक उपाययोजनांवर काम होत आहे. मात्र, जनावरांच्या चारा आणि पाणी समस्येची दखल घेतली जात नसल्याची ओरड पशुपालकांमधून होत होती. त्या पार्श्‍वभूमीवर चारा छावण्या सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

मोर्शी व अचलपूर तालुक्‍यांत चाऱ्यांचा प्रश्‍न सर्वाधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्‍यांत चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली. जिल्ह्यातील चाऱ्यांचा प्रश्‍न गंभीर झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर तत्काळ बंदीचे आदेश दिले आहेत. 

अशी आहे जनावरांची स्थिती जिल्ह्यात एकूण १० लाख ३५५५ जनावरे आहेत. यात अमरावती शहरात ९९,९७५, अंजनगावसूर्जीत ५७,७८७, अचलपूर येथे ९०,५४७, भातकुलीत ४७,४०६, चिखलदरा तालुक्यात ७८,४७४, चांदूररेल्वे तालुक्‍यात ५५,५८८, चांदूरबाजार तालुक्यात ६६,५२९, धारणी येथे १ लाख ४५२६, धामणगाव रेल्वे तालुक्‍यात ७५,९२९, दर्यापूरात ५९,१२६, मोर्शीत ७६५९३, नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यात ६७१२३, तिवसा तालुक्यात ५०, ८४४, वरुड तालुक्‍यात ७६ हजार १९५ याप्रमाणे जनावरे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT