चारा छावणी
चारा छावणी  
मुख्य बातम्या

चारा छावण्यांसाठी चालकांच्या चकरा

टीम अॅग्रोवन

नगर  : सरकारने जनावरांच्या छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले खरे, पण अर्ज कुठं करायचा, त्याला काय कागदपत्रे द्यायची, मंजुरी कशी आणि कधी मिळणार याबाबत कसलीही माहिती मिळत नसल्याने चारा छावण्या सुरू करण्यास इच्छुक असलेले संस्था चालक जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. अजून अर्जच उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अध्यादेश निघाला असला तरी छावण्या नेमक्‍या कधी सुरू होणार हे प्रशासनालाही सांगता येईना.  नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळीची तीव्रता अधिक आहे. चारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अधिक गंभीर असल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून छावण्या, चारा डेपो सुरू करण्याची मागणी केली जात होती. चारा, पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या ग्रामीण शिवाराला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने २५ जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताकाच्या पूर्वी चारा छावण्या सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज व अटी, शर्तींचा मसुदा बनविण्याचे काम सुरू आहे. छावण्या सुरू करण्यासाठी टंचाई शाखेत इच्छुकांचा गराडा पडत असून चारा छावणी सुरू करण्यासाठी नेमके काय लागते, अर्ज कसा करायचा, याबाबत माहिती मिळेनाशी झाली आहे.  यंदा पावसाने हात आखडता घेतल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. जिल्ह्यातील ८९ महसूल मंडलांतील १४२१ गावांत दुष्काळ घोषित झाला असून, चाराटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावणी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. जनावरांसाठी आवश्‍यक तेथे चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला जारी केले आहेत. छावण्या आवश्‍यकतेनुसार सुरू करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १७ लाख जनावरांच्या दावणीला दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या अंतिम मंजुरीनंतर हा मसुदा तहसीलदारांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर संबंधित तहसीलदार प्रस्ताव तयार करून प्रांताधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT