कृषी शिक्षणाच्या बळकटीकरणावर भर : कृषिमंत्री सिंह
कृषी शिक्षणाच्या बळकटीकरणावर भर : कृषिमंत्री सिंह  
मुख्य बातम्या

कृषी शिक्षणाच्या बळकटीकरणावर भर : कृषिमंत्री सिंह

वृत्तसेवा

नवी दिल्ली : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभरात मोठा बदल होत आहे. कृषी क्षेत्रातही बदलाचे वारे वाहत असून, कालानुरूप कृषी शिक्षणाला बळकट करण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी रविवारी (ता. 3) केले.

बिहारमधील डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठात रविवारी आयोजित एका कार्यक्रमात कृषिमंत्री बोलत होते. कृषी शिक्षणाविषयी कृषिमंत्री म्हणाले, की माहिती तंत्रज्ञानाच्या अफाट वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. शेतीही यापासून दूर राहू शकत नाही. अत्याधुनिक अवजारे, नवनवीन पद्धती आणि संगणकाद्वारे शेतीमध्येही बदलाचे वारे वाहत आहेत. याचा लाभ कृषी क्षेत्राला मिळावा म्हणून कृषी शिक्षणाचे या दृष्टीने बळकटीकरण केले पाहिजे. सरकारने ही बाब लक्षात घेऊन पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कृषी शिक्षणाला व्यावसायिक दर्जा दिला आहे. तसेच नवीन, आधुनिक शेती पद्धती आणि तंत्रज्ञानाचा कृषी शिक्षणात वापर व्हावा, असाही प्रयत्न केला जात आहे.

अधिष्ठाता समितीच्या शिफारशीनुसार कृषी महाविद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषी पदवीधारकांचा आत्मविश्‍वास वाढविणे आणि त्यांना शेती क्षेत्रात शेतकरीहितासाठी चांगले कार्य करण्याची संधी मिळवून देण्यात येत असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.

शाळेतील मुले आणि युवकांना कृषी शिक्षणाकडे आकर्षित करणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी 2013-14 च्या तुलनेत अर्थसंकल्पात कृषी शिक्षणासाठी 47.4 टक्‍क्‍यांनी निधी वाढविला आहे. -राधामोहनसिंह , केंद्रीय कृषिमंत्री

कृषी पदवीधरांना भविष्यात मोठी संधी कृषीतील उच्च गुणवत्ता शिक्षणासाठी नेमलेल्या पाचव्या अधिष्ठाता समितीने नुकताच अहवाल सादर केला आहे. सरकारने तो मंजूरही केला आहे. यामुळे कृषी आणि समकक्ष पदवीला व्यावसायिक (प्रोफेशनल) दर्जा मिळाला आहे. कृषी पदवीधारकांना भविष्यात याचा निश्‍चितच लाभ मिळणार आहे. कृषी पदवी ही आता अभियंता (इंजिनिअर) पदवीला असलेल्या दर्जाच्या बरोबर आहे. परिणामी देशासह परदेशात कृषी पदवीधरांना मोठी संधी मिळणार आहे, असे कृषिमंत्री सिंह यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT